गरीब रुग्णांना स्वस्तात औषधं मिळणार; ठाण्यातील तरुण उद्योजकाला रतन टाटांचा मदतीचा हात

त्या तरुणाला थेट रतन टाटांनी मदतीचा हात दिल्यानं या तरुणाला खरा आधार मिळालाय.

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 16:38 PM, 19 Jan 2021
गरीब रुग्णांना स्वस्तात औषधं मिळणार; ठाण्यातील तरुण उद्योजकाला रतन टाटांचा मदतीचा हात

ठाणेः ठाण्यातील एक तरुणानं जेनेरिक आधार ही एका औषधांची विक्री करणारी कंपनीची स्थापना केली. देशातील गरीब रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देणे, या उद्देशासाठीच एका तरुणानं या कंपनीची निर्मिती केली. विशेष म्हणजे अर्जुन देशपांडे या तरुणानं 16व्या वर्षी या कंपनीची स्थापना केली, तर त्या तरुणाला थेट रतन टाटांनी मदतीचा हात दिल्यानं या तरुणाला खरा आधार मिळालाय. (Poor Patients Will Get Cheaper Medicines; Ratan Tata Helping Hand To Young Entrepreneur From Thane)

ही कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. खासकरून कोरोनाच्या काळात अर्जुनने अनेक गरजूंना स्वस्तात औषधे उपलब्ध करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत आणि vocal for local अभियानाला चालना देण्यासाठी तरुणानं ही कंपनी सुरू केली, आता त्याला रतन टाटांनी मदतीचा हात दिलाय. रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधारला आर्थिक आणि नैतिक समर्थन दिलेय.

देशभरातील 100 हून जास्त शहरात स्वस्तदरात औषधं उपलब्ध

देशात सध्या कोरोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे. जेनेरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतलेय. 4 महिन्यांत ठाण्यातून सुरू झालेली फार्मा कंपनी देशभरातील 100 हून जास्त शहरात स्वस्तदरात औषधं उपलब्ध करून देते. 4 महिन्यांच्या लॉकडाऊन काळात लोकांना रोजगार संधी मिळालीय. ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनरना औषधे कमी किमतीत मिळावी, असा या तरुणाचा उद्देश आहे. तसेच भारतातील 60 % लोकांना आज औषधं परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाहीत, पण 85 ते 90% औषधे ही भारतातच बनतात, ज्यांना जेनेरिक म्हटले जाते. त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडेंचा प्रयत्न आहे.

भारतातल्या टॉप 10 कंपन्यांच्या मालकांचीही अर्जुनसोबत व्यवसाय करण्याची इच्छा

येत्या काही महिन्यात जेनेरिक आधारचे केंद्र फक्त ठाणे, मुंबई, पुणे नव्हे, तर सांगली, सातारा, मिरज आणि कोल्हापूर, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ग्रामीण शहरात ही सुरू करण्याचा ध्यास अर्जुनने आपल्या हाती घेतलाय. अनेक पुरस्काराने 18 वर्ष अर्जुनला सन्मानित करण्यात आलेय. भारतातल्या टॉप 10 कंपन्यांच्या मालकांनीही अर्जुनसोबत व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीहून थेट ठाण्यात येऊन अनेकांनी अर्जुनची भेट घेतलीय. विशेष म्हणजे उद्योगपती रतन टाटा यांनी अर्जुनाचे कौतुक करून त्याच्या कंपनीचे शेयर घेतलेत.

संबंधित बातम्या

काय आहे PMBJK योजना? ज्याद्वारे हजारो लोकांना लाखो रुपये मिळतात, यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता!

Poor Patients Will Get Cheaper Medicines; Ratan Tata Helping Hand To Young Entrepreneur From Thane