निसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी

निसर्ग चक्रीवादळाचा तडाका बसलेल्या पोल्ट्री धारक शेतक-यांनी  खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत शासनाकडून भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. (Poultry farmers meet to MP Sunil Tatkare) 

निसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी

रायगड- निसर्ग चक्रीवादळाचा तडाका बसलेल्या पोल्ट्री धारक शेतक-यांनी  खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत शासनाकडून भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.  पोल्ट्री धारक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन खासदार सुनिल तटकरे यांनी दिले. जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी तटकरे यांच्या रोहा येथील निवासस्थानी भेट घेतली.(Poultry farmers meet to MP Sunil Tatkare)

पोल्ट्री धारक शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कपंनी व्यवस्थानाशी बोलणी करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल. कर्ज पुरवठा न करणाऱ्या बँक व्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन केद्रांच्या योजनेतून कर्ज पुरवठा देण्यास प्राधान्य देणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

पोल्ट्री व्यावसायिकांची नुकसान भरपाईची मागणी

निसर्ग चक्रीवादळाच्या फटका बसलेल्या रायगड मधील शेकडो पोल्ट्री व्यावसाईकांनी सुनिल तटकरे यांच्या रोहा येथील निवासस्थानी भेट घेत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त घरांना, शेतीला, बागांना भरपाई भेटली मात्र पोल्ट्री शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई भेटली नसल्याचे शेतकऱ्यांनी तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

या बाबत लवकरच निसर्ग चक्रीवादळातील नुकसान ग्रस्त पोल्ट्री शेतक-यांना मदत मिळण्या बाबत सबंधित मत्र्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ. जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ग्रामपचांयती कडील कर आकारणी बाबत चर्चा करु असे, आश्वासन तटकरे यांनी पोल्ट्री धारक शेतकऱ्यांना दिले.

पोल्ट्री धारक शेतकऱ्यांनी खासदारांसमोर मांडल्या समस्या

पोल्ट्री धारक शेतक-यांनी सुनिल तटकरे यांची भेट घेऊन नुकसान भरपाई, वीज बिल, ग्रामपचांयत कर, पोल्ट्री फिड व चिकन खरेदी विक्री कपंनी व्यवस्थापनाकडून होणारी पिळवणूक व राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज नाकारणे आदी समस्या मांडल्या. या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यात यावा, असे निवेदन शेतकऱ्यांकडून तटकरे यांना देण्यात आले.

पोल्ट्री खाद्य व पक्षी खरेदी विक्री करणाऱ्या कपंन्याच्या व्यवस्थपानाशी बोलणी करुन पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील बँकांशी बोलणी करुन केद्र शासनाच्या योजने अतंर्गत शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन यावेळी खासदार तटकरे यांनी पोल्ट्री धारक शेतकऱ्यांना दिले. पोल्ट्री धारक शेतकऱ्यांच्या समस्या अनिल खामकर आणि विलास साळवी यांनी मांडल्या.

संबंधित बातम्या:

ओरिएन्टल इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही : सुनिल तटकरे

आम्ही सत्तेत आणि राज ठाकरे विरोधीपक्षात असल्यास आनंदच : सुनिल तटकरे

(Poultry farmers meet to MP Sunil Tatkare)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *