वीज बिल थकल्यानं वर्ध्यातील जलसंपदा विभागाचा वीज पुरवठा खंडित, अधिकारी, कर्मचारी उकाड्याने हैराण

वीजेचे बिल न भरल्याने जलसंपदा विभागाच्या कर्मशाळेचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा नसल्याने अधिकारी, कर्मचारी उकाड्याने हैराण झाले आहे.

वीज बिल थकल्यानं वर्ध्यातील जलसंपदा विभागाचा वीज पुरवठा खंडित, अधिकारी, कर्मचारी उकाड्याने हैराण
महावितरण
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 2:00 PM

वर्धा : वीजेचे बिल न भरल्याने जलसंपदा विभागाच्या कर्मशाळेचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा नसल्याने अधिकारी, कर्मचारी उकाड्याने हैराण झाले आहे. तर रात्रीच्या वेळी अंधारात सुरक्षा रक्षकांची कर्तव्य बजावताना कसरत करावी लागणार आहे.

घामाच्या धारा पुसतंच काम

वर्ध्यातील जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी, अभियांत्रिकी कर्मशाळा, उपविभाग क्रमांक तीनचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय. वीज बिल थकल्यानं हा वीज पुरवठा कापण्यात आला आहे. पण, सध्या पावसाच्या लपंडावात वाढलेल्या उकाड्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना घामाच्या धारा पुसतंच काम करावं लागत आहे.

अनेक अधिकारी, कर्मचारी उकाड्यात बसून काम

वर्ध्याच्या जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी, अभियांत्रिकी कर्मशाळा उपविभाग क्रमांक तीन या कार्यालयाचं पाच लाख रुपयांवर वीज बिल थकलं आहे. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यानं महिनाभरापूर्वी या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला गेला आहे. महिनाभरापासून वीज पुरवठा खंडीत असल्यानं काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना उकाड्यात बसून काम करावं लागतं. त्यामुळं प्रकृती बिघडण्याचीही भीती व्यक्त होतं आहे.

हा परिसर दहा एकरांचा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहेत. या झुडपात सरपटणाऱ्या प्राण्यांचं वास्तव्य असतं. त्यामुळे अशास्थितीत रात्रीच्या वेळी काळोखात कर्तव्य बजावताना रात्र पातळीतील सुरक्षा रक्षकांनाही कसरत करावी लागत आहे.

(Power supply cut off in Wardha Water Resources Department due to power bill pending)

संबंधित बातम्या : 

नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे 301 अभ्यासक्रम

बांधकाम सुरु असणारी 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेली 5 लोकं 4 तासांत रेस्क्यू

सत्ताधारी विरोधकांची बाकं बदलली, पण काळ्या पैशांसंबंधी सरकारची उत्तर सारखीच, राऊतांची टीका

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.