आधीच लक्ष घातलं असतं, तर आता भीक मागायची वेळ आली नसती : प्राजक्त तनपुरे

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या भिक मांगो आंदोलनावर सडकून टीका केली आहे (Prajakt tanpure on chandrashekhar bawankule electricity).

आधीच लक्ष घातलं असतं, तर आता भीक मागायची वेळ आली नसती : प्राजक्त तनपुरे

वर्धा : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या भिक मांगो आंदोलनावर सडकून टीका केली आहे (Prajakt tanpure on chandrashekhar bawankule electricity). माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच कामावर लक्ष दिलं असतं तर आता त्यांच्यावर भीक मांगो आंदोलनाची वेळ आली नसती, असं मत प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलं. यावेळ तनपुरे यांनी वीज दरवाढीला माजी ऊर्जामंत्री बावनकुळे जबाबदार असल्याचाही आरोप केला.

प्राजक्त तनपुरे म्हणाले, “वीज दरवाढीला माजी ऊर्जामंत्री जबाबदार आहेत. त्यांनी त्यांच्या काळात योग्य काम केलं असतं, तर भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ आली नसती. वीज दरवाढ करताना एकावेळी करत नाहीत, तसं करताना मागील काळही लक्षात घेतला जातो. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी लक्ष घातलं असतं, तर त्यांच्यावर ‘भीक मांगो’ आंदोलनाची वेळ आली नसती.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“ऊर्जामंत्री असताना बावनकुळे यांनी लक्ष घातलं असतं. महाजनकोची कार्यक्षमता (एफिशिएन्सी) कमी केली असती, तर वीजदर वाढले नसते. माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या दुर्लक्षामुळेच आज वीजदर वाढवण्याची वेळ आली. त्यामुळेच माजी ऊर्जामंत्र्यांना भीक मागण्याची पाळी आली,” असंही प्राजक्त तनपुरे म्हणाले.

यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी देशभरातील इंधन दरवाढीच्या प्रश्नावरुन भाजपला लक्ष्य केलं. भीक मांगो आंदोलन म्हणजे केवळ राजकीय स्टंट आहे. आज जर बावनकुळे वीज बिलासाठी भीक मागत असतील, तर आम्हीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन भीक मागावी का? असा सवाल प्राजक्त तनपुरे यांनी विचारला.

हेही वाचा :

चक्रीवादळाने कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान, अनेक ठिकाणी प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही : प्राजक्त तनपुरे

UGC | विद्यापीठ परीक्षांबाबत यूजीसीचे नवे निर्देश; उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री म्हणतात…

Prajakt tanpure on chandrashekhar bawankule electricity

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *