मढ्यावरचं लोणी खाण्यात मोदी ‘एक्सपर्ट’ : प्रकाश आंबडेकर

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या राजकारणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) कडाडून टीका केली. मोदी आणि अमित शाह यांनी प्रचारासाठी सर्जिकल स्ट्राईकचे केलेले राजकारण योग्य नाही. असे करणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे आणि हे करण्यात मोदी ‘एक्सपर्ट’ असल्याचा गंभीर आरोप प्रकाश …

मढ्यावरचं लोणी खाण्यात मोदी ‘एक्सपर्ट’ : प्रकाश आंबडेकर

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या राजकारणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) कडाडून टीका केली. मोदी आणि अमित शाह यांनी प्रचारासाठी सर्जिकल स्ट्राईकचे केलेले राजकारण योग्य नाही. असे करणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे आणि हे करण्यात मोदी ‘एक्सपर्ट’ असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते अहमदनगर येथे बोलत होते.

आंबेडकर यांनी प्रज्ञा ठाकूर यांचाही खरपूस समाचार घेतला. आरएसएस ही दहशतवादी संघटना असून साध्वी प्रज्ञासिंह या संघटनेशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भारतीयांनी इमानदार राहून दहशतवादाच्या पाठीशी राहायचे का? हे ठरवलं पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘अशोक चव्हाणांनी निवडणुकीत मतदारांना पैसे  वाटले’

प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निवडणुकीत मतदारांना पैसे  वाटल्याचा आरोप केला. एकदा आम्हाला सत्ता द्या, या नेत्यांनी जेवढे खाल्ले आहे, तेवढ धुऊन काढू, असेही आंबेडकर म्हणाले. तसेच छगन भुजबळांनाही आमच्या विरोधात बोलला, तर याचा परिणाम समीर भुजबळ यांच्या मतांवर होईल, असा इशारा आंबेडकरांनी दिला. ओबीसीच्या नेत्यांनी वंचित आघाडीच्या विरोधात बोलल्यास त्याचा परिणाम त्यांच्यावरच होईल असही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’

आंबेडकर यांनी राज ठाकरेंवरही जोरदार टीका केली. ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. त्यांच्या घरातील लग्न नाही, तर मग ते का नाचताय? कोणासाठी नाचताय? असा उपरोधिक प्रश्न त्यांनी विचारला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *