मुलाचा अट्टाहास जीवावर बेतला, 10 व्या प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

बीड : वंशाला दिवा पाहिजे, या भ्रामक कल्पनेने पछाडलेल्या कुटुंबीयांनी महिलेचा जीव घेतला आहे. ‘मुलगा पाहिजे’ या अट्टाहासापायी महिलाचे जीव गेला आहे. दहाव्यांदा प्रसूतीदरम्यान बीडमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मीरा एखंडे असे या महिलेचे नाव आहे. बीडमधील माजलगाव येथील ही खळबळजनक घटना आहे. मीरा एखंडे या महिलेची दहावी प्रसूती होत असताना, …

मुलाचा अट्टाहास जीवावर बेतला, 10 व्या प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

बीड : वंशाला दिवा पाहिजे, या भ्रामक कल्पनेने पछाडलेल्या कुटुंबीयांनी महिलेचा जीव घेतला आहे. ‘मुलगा पाहिजे’ या अट्टाहासापायी महिलाचे जीव गेला आहे. दहाव्यांदा प्रसूतीदरम्यान बीडमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मीरा एखंडे असे या महिलेचे नाव आहे. बीडमधील माजलगाव येथील ही खळबळजनक घटना आहे.

मीरा एखंडे या महिलेची दहावी प्रसूती होत असताना, तिला रक्तस्राव झाला. यामुळे मीरा यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

मुलाच्या अट्टाहासापायी मीरा यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मीरा यांची याआधी नऊवेळा प्रसूती झाली होती. त्यांना सात मुली आहेत. याआधी एका मुलीची मृत्यू झाला असून, दोनदा गर्भपात झाल्याचेही उघड झाले आहे.

बीड जिल्ह्यात याआधीही अनेक गर्भपाताची आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून महिलांचे जीव घेतल्याची प्रकरणं समोर आली आहेत. याच बीड जिल्ह्यातून आता मीरा एखंडे या महिलेची ही खळबळजन घटना समोर आली आहे. मीरासाठी हळहळ व्यक्त होत असताना, मुलाच्या अट्टाहासापायी जीव घेतल्याबाबत संतापही व्यक्त केला जातो आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *