सांगलीत गर्भवती महिलेकडून ग्रहणातील अंधश्रद्धांना मुठमाती, भाजी-फळे चिरत ग्रहणही पाहिले

सांगलीतील एका गर्भवती महिलेने पिढ्यान पिढ्याच्या ग्रहणाच्या काळातील अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे (Superstition about Pregnant women amid Solar Eclipse).

सांगलीत गर्भवती महिलेकडून ग्रहणातील अंधश्रद्धांना मुठमाती, भाजी-फळे चिरत ग्रहणही पाहिले

सांगली : जिल्ह्यातील इस्लामपुरात एका गर्भवती महिलेने पिढ्यान पिढ्या सुरु असलेल्या ग्रहणाच्या काळातील अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे (Superstition about Pregnant women amid Solar Eclipse). या महिलेने ग्रहण काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळं पानं तोडणं, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह अनेक शारीरिक हालचाली केल्या. तसेच प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून ग्रहणाचाही आनंद घेतला. समृद्धी चंदन जाधव असं या महिलेचं नाव आहे. त्यांनी ग्रहणाच्या काळात अंधश्रद्धेतून निषिद्ध ठरवलेल्या अनेक दैनंदिन कृती करुन या अंधश्रद्धा झुगारल्या आहेत.

इस्लामपूर येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये राहणाऱ्या या गर्भवती महिलेने आज पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी समृद्धी जाधव म्हणाल्या, “आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे आणि माझ्या कुटुंबाचं प्रबोधन केलं. त्यानंतर आम्ही हे धाडसी पाऊल टाकलं. माझ्या कुटुंबीयांनीही मला यात साथ दिली. सासूबाई सिंधुताई जाधव, चंदन जाधव, दीपक जाधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिलं.”

या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला. विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला नको का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. इस्लामपुर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल याही यावेळी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या ,” अंनिसच्या जनजागृतीचा कार्यक्रम पथदर्शी आहे. ग्रहणाच्या कालावधीत गर्भवती महिलेवर व गर्भावर कोणताही परिणाम होत नाही. बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण झालेली असते. गर्भधारणेच्या काळात ग्रहण पाहिल्याने व कोणतीही शारीरिक कृती केल्याने बाळाला इजा होते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. हे आजच्या उपक्रमातून पुढे येईल.”ं

अंधश्रद्धा निर्मुलनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले,” खगोलीय घटना अनुभवल्या पाहिजेत. याबाबत आम्ही नेहमीच कृती कार्यक्रम घेत असतो. सूर्यग्रहणाबाबत आजचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडला. यासाठी समृद्धी जाधव या युवतीचे कौतुक करावे तितके थोडे आहे.”

हेही वाचा :

Solar Eclipse 2020 | ग्रहणकाळात देशभरातील मंदिरे बंद, तुळजाभवानी, विठ्ठल रखुमाईची मूर्ती सोवळ्यात

PHOTO : शतकातील महत्त्वाचं सूर्यग्रहण, देशाच्या विविध भागातून टिपलेले सूर्यग्रहणाचे दुर्मिळ फोटो

Solar Eclipse: सूर्यग्रहण कसं पाहावं, ‘या’ गोष्टी करणं धोकादायक ठरु शकतं

Solar Eclipse Live : खगोलप्रेमींना सूर्यग्रहणाची पर्वणी, राजस्थानात कंकणाकृती, महाराष्ट्रात खंडग्रास

Superstition about Pregnant women amid Solar Eclipse

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *