राष्ट्रवादीकडून बीडसाठी अमरसिंह पंडितांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब

बीड : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमधून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून अमरसिंह पंडित यांचं नाव निश्चित केले आहे, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी बीडमधून प्रीतम मुंडेच भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असतील, हे जाहीर केले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे विरुद्ध अमरसिंह पंडित असा सामाना रंगण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, बीडमध्ये मुंडे विरुद्ध पंडित अशीच लढत …

राष्ट्रवादीकडून बीडसाठी अमरसिंह पंडितांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब

बीड : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमधून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून अमरसिंह पंडित यांचं नाव निश्चित केले आहे, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी बीडमधून प्रीतम मुंडेच भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असतील, हे जाहीर केले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे विरुद्ध अमरसिंह पंडित असा सामाना रंगण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, बीडमध्ये मुंडे विरुद्ध पंडित अशीच लढत होईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यात राज्यातील काही मतदारसंघांमधील संभाव्य उमेदवारांच्या नावांवर निश्चितीही केली. त्यामध्ये बीडमधून राष्ट्रवादीने अमरसिंह पंडित यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे.

दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रीतम मुंडेंच्या नावाची घोषणा केली होती. राज्याचा दौरा करत असताना ते बीडमध्ये म्हणाले होते, बीडमधून विद्यमान खासदार म्हणजे प्रीतम मुंडे याच आमच्या उमेदवार असतील, यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे बीडमधून प्रीतम मुंडे याच भाजपच्या उमेदवार असतील.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. काँग्रेसने काल महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. धनंजय महाडिक, सुप्रिया सुळे, संजय दीना पाटील, सुनील तटकरे यांची अपेक्षेप्रमाणे नावं पहिल्या यादीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील 10 जागांवर उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने जाहीर केला.

कोण आहेत अमरसिंह पंडित?

अमरसिंह पंडित हे राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे सुपुत्र असून, ते सध्या राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसेचे प्रदेश सरचिटणीसपदही अमरसिंह पंडित यांच्याकडे आहे. पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सभापती असा राजकीय प्रवास अमरसिंह पंडित यांचा आहे. घरातच राजकारणाचे बाळकडून त्यांना मिळालं आहे. त्यांचे चुलत काका म्हणजेच बदामराव पंडित हेही राज्याचे मंत्री होते.

कोण आहेत डॉ. प्रीतम मुंडे?

डॉ. प्रीतम मुंडे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या त्या धाकट्या भगिणी आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधानानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून डॉ. प्रीतम मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्या जागेवारुन प्रीतम मुंडे या तब्बल 7 लाख मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. सध्या त्या बीडचे प्रतिनिधित्व लोकसभेत करतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *