खासदार प्रीतम मुंडेंच्या प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीत उत्तर

या प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मराठीतून उत्तर दिलं. मी महाराष्ट्राचीच असून मलाही शेतकऱ्यांच्या समस्या माहित आहेत, निश्चितच शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं उत्तर स्मृती इराणी यांनी दिलं.

खासदार प्रीतम मुंडेंच्या प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीत उत्तर

नवी दिल्ली : मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केली. या प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मराठीतून उत्तर दिलं. मी महाराष्ट्राचीच असून मलाही शेतकऱ्यांच्या समस्या माहित आहेत, निश्चितच शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं उत्तर स्मृती इराणी यांनी दिलं.

स्मृती इराणी यांच्यासाठी प्रीतम मुंडेंनी इंग्रजीतून प्रश्न विचारला होता. पण मलाही मराठी येते, असं म्हणत स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर दिलं. महिला आणि बालकल्याण विभागासह वस्त्रोद्योग खातंही स्मृती इराणी यांच्याकडेच आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग विभागाने कापूस उत्पादक जिल्ह्यांकडे लक्ष द्यावं, ज्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल, अशी मागणी प्रीतम मुंडेंनी केली होती. शक्य ती मदत मराठवाड्याला केली जाईल, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडेंनी 9 वर्षांपूर्वी मांडलेला मुद्दा प्रीतम मुंडेंनी पुन्हा उचलून धरला

प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद देत स्मृती इराणी यांनी हातमाग, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल असं आश्वासन दिलं.

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. पण कधी पावसाचा फटका बसतो, तर कधी दर कमी असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. पण वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही योजना आणल्यास त्याचा थेट फायदा होईल. यासह विशेष मदतही देण्यात यावी, अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली.

पाहा व्हिडीओ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *