मागासवर्गीयांच्या बढत्यांबाबत तोडगा काढा, अन्यथा बेमुदत उपोषण; हरिभाऊ राठोड यांचा इशारा

मागण्या मान्य झाल्या नाही, तर बेमुदत उपोषण करण्यात येईल,असा इशारा हरिभाऊ राठोड यांनी दिला. (backward class Azad Maidan)

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 20:50 PM, 1 Dec 2020
backward class Azad Maidan

ठाणे : “नैसर्गिक स्वभावानुसार भाजपने मागासवर्गीय शासकीय कर्मचार्‍यांना बढती देताना अन्याय केला. मात्र, महाविकास आघाडीकडूनही मागासवर्गीयांवर अन्यायच होत आहे. येत्या 4 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलवून आमच्या मागण्यांवर तोडगा काढावा. अन्यथा मागण्या मान्य झाल्या नाही, तर 5 डिसेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येईल,” असा इशारा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी दिला. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. (protest from 5th December at Azad Maidan for demands of backward classes)

“मागासवर्गीय समुदायाकडून केल्या जाणार्‍या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. 4 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी याबाबात बैठक बोलवावी. आमच्या सर्व मागण्यांवर तोडगा काढावा. तोडगा न काढल्यास येत्या 5 डिसेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येईल,” असे हरिभाऊ राठोड म्हणाले. या उपोषणात कास्ट्राईबचे अरुण गाडे यांच्यासह रेल्वेकर्मचारी आणि विविध मागासवर्गीय संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होतील.

बढत्यांच्या निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

मागील अनेक वर्षांपासून मागासवर्गीयांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलनेदेखील करण्यात आलेली आहेत. मात्र, या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मागासवर्गीयांना नोकरीमध्ये बढती देण्यात येत नाही. यासाठी काही प्रशासकीय अधिकारी कारणीभूत आहेत. ते जाणीवपूर्वक निर्णय घेत नसल्याने मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांना बढती मिळत नाही, असा आरोपही यावेळी हरीभाऊ राठोड यांनी केला.

दरम्यान, हरिभाऊ राठोड यांनी दिलेल्या इशाऱ्यांनतर राज्य सरकार काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे विविध मागण्यांसाठी मराठा समाजदेखील आक्रमक झाला आहे. रविवारी (29 नोव्हेंबर) पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुंबईवर लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचा या बैठकीत ठरले होते.

संबंधित बातम्या :

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, 1 डिसेंबरला निदर्शनं तर 8 डिसेंबरला लाँग मार्च

उदयनराजेंना बोलायचं ते बोलू द्या, मराठा आरक्षणाबद्दल सरकार गंभीर, शिवसेनेचं उत्तर

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

(protest from 5th December at Azad Maidan for demands of backward classes)