सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय; मी “मोका” म्हटलंय : गिरीश बापट

आपल्याला “मोका ” घ्यायचाय. मी मोका म्हटलंय, असं विधान भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केल्यानं एकच हशा पिकला.

  • आश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 19:56 PM, 13 Jan 2021
BJP MP Girish Bapat

पुणे : ”मराठीत एक म्हण आहे. सोळावं वरीस धोक्याचं. पण मी थोडं बदलतो. सोळावं वरीस मोक्याचे. त्यामुळं आपल्याला “मोका ” घ्यायचाय. मी मोका म्हटलंय, असं विधान भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केल्यानं एकच हशा पिकला. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत खासदार गिरीश बापट यांनी चांगलीच टोलेबाजी केलीय. ( Pune BJP MP Girish Bapat Verbal Gangsterism)

पुण्यात यंदा 1 लाख घरात पाईप गॅस पोहोचवून सिलिंडरमुक्त शहर करण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने निश्चित केल्याचं पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी संगितले. महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गिरीश बापट बोलत होते. एमएनजीएलमुळे 300 रुपयांची बचत होते. आतापर्यंत 22 हजार घरात कनेक्शन पोहोचवली. येत्या वर्षात संपूर्ण पुणे शहर सिलिंडरमुक्त करणार असल्याचं गिरीश बापट यांनी यावेळी सांगितलं.

गिरीश बापट वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत

भाजपा नेते आणि खासदार गिरीश बापट नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तरुणाईला संबोधताना गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘हिरवा देठ‘ असं केलेलं वक्तव्यसुद्धा चांगलेच गाजले होते. ‘रेशन व्यापारी आणि सरकार हे नवरा-बायकोसारखे असतात, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो,’ असे माजी खासदार गजाजन बाबर भाषणात म्हणाले होते. त्यावर बापट यांनी वरील विधान केले होते.

जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाले… अहो ते तर पुण्याचे भिडे : गिरीश बापट

भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पुणेकरांचे किस्से सांगत जोरदार टोलेबाजी केल्याचं काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. यावेळी त्यांनी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यापासून तर अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक किस्से सांगितले होते. तेव्हा उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता. ते संस्कृती प्रतिष्ठान आयोजित अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.

संबंधित बातम्या

जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाले… अहो ते तर पुण्याचे भिडे : गिरीश बापट

Pune BJP MP Girish Bapat Verbal Gangsterism