दौंडमधील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य आता सरपंचपदी, 21 वर्षीय स्नेहलची घोड्यावर मिरवणूक

दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती (Pune Daund Youngest Sarpanch)

दौंडमधील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य आता सरपंचपदी, 21 वर्षीय स्नेहलची घोड्यावर मिरवणूक
दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 3:52 PM

दौंड : दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल संजय काळभोरची निवड झाली आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी स्नेहल बिनविरोध सरपंचपदी निवडून आली. त्यानंतर तिची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. (Pune Daund Snehal Kalbhor Youngest Gram Panchayat Sarpanch)

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती. आता बोनस म्हणजे तिच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण सरपंच होण्याचा मानही स्नेहल काळभोरला मिळाला आहे.

सरपंच-उपसरपंचांची घोड्यावरून मिरवणूक

स्नेहल संजय काळभोर ही MCA च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. काल झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहलची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सरपंच-उपसरपंचांची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. आपल्या शिक्षणाचा गावाच्या विकासासाठी वापर करुन अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा मानस स्नेहल काळभोर हिने व्यक्त केला आहे.

अहमदनगरमध्ये नवरा-बायको गावचा कारभार हाकणार

अहमदनगरमध्ये पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य झाले आणि आता थेट सरपंच-उपसरपंच बनून गावचा कारभार हाकणार आहेत. जयश्री सचिन पठारे (Jayashreee Sachin Pathare) या सरपंच तर त्यांचे पती सचिन पठारे (Sachin Pathare) हे उपसरपंच झाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात या दोघा नवरा बायकोच्या राजकीय यशाची चर्चा रंगली आहे. वाळवणे ग्रामपंचायत सदस्यावर आता नवरा-बायको अधिकार गाजवणार आहेत.

निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने हा मान जयश्री पठारे यांना मिळाला असून गावाने त्यांचे पती सचिन पठारे यांना उपसरपंच करायचं ठरवलं आहे. त्यामुळे दोघेही आता सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले आहे. (Pune Daund Snehal Kalbhor Youngest Gram Panchayat Sarpanch)

सांगलीतही जोडीने सरपंचपद

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भीमराव माने यांच्या नेतृत्वाखालील गटाने 17 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला. इतकंच नव्हे तर यंदा भीमराव माने यांनी स्वतःबरोबर आपल्या पत्नीला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि दोघा पती-पत्नीचा विजयही झाला. तर यंदा ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण हे खुला महिला गट पडल्याने माने गटाने भिमराव माने यांच्या पत्नी अनिता माने यांना सरपंच आणि भीमराव माने यांची उमेदवारी निश्चित केली होती. पार पडलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत माने दाम्पत्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संबंधित बातम्या :

पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य, आता सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार

पत्नी सरपंच-पती उपसरपंच, सांगलीत नवरा-बायको कवठेपिरान गावाचे कारभारी

(Pune Daund Snehal Kalbhor Youngest Gram Panchayat Sarpanch)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.