‘शरजीलला अटक करा’, महापौर मोहोळ, जगदीश मुळीक पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार

हिंदू धर्मियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी करत पुण्यातील भाजप नेते पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. | Pune police Should Arrest Sharjeel Usmani

'शरजीलला अटक करा', महापौर मोहोळ, जगदीश मुळीक पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार
mayor mohol, jagdish Mulik And Sharjeel Usmani
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 12:51 PM

मुंबई : हिंदू धर्मियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी करत पुण्यातील भाजप नेते पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. शरजीलच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. (Pune police Should Arrest Sharjeel Usmani mayor Mohol And Jagdish mulik Will Meet Pune Commissioner)

मंगळवारी एल्गार परिषदेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात मोगलाई आली आहे का, हिंदू रस्त्यावर पडलेत का, असा सवाल त्यांनी केला होता. फडणवीसांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुण्यातील भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

कोणत्याही परिस्थितीत हिंदूविरोधी वक्तव्ये करणाऱ्या शरजील उस्मानीला ताबडतोब अटक करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक यांनी केली आहे. आज (बुधवार) ते पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

ब्राह्मण महासंघही आक्रमक

एल्गार परिषदेचे आयोजक बी. जी. कोळसे पाटील यांच्या सहित सर्व आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ब्राम्हण महासंघाच्या वतीनं करण्यात आलीये. धार्मिक द्वेष पसरवून, हिंदु धर्म विरोधात वक्तव्ये करणाऱ्या वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे पण तितकेच जबाबदार आहेत, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले.

राज्यात सामाजिक तेढ निर्माण होऊन वक्त्यांवर गुन्हे दाखल होण्याची ही सलग दुसरी वेळ असून सुद्धा प्रशासन आयोजकांच्या गुन्ह्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे, असा गंभीर आरोप दवे यांनी करत सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

काही ठराविक लोकांना बोलावून मुद्दाम हिंदु धर्माच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्या एल्गारचे आयोजक कोळसे पाटील यांच्यासहित इतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ब्राम्हण महासंघाच्या वतीनं करण्यात आलीये. स्वारगेट पोलीस स्टेशनला तशा प्रकारच्या निवेदन महासंघाच्या वतीनं देण्यात आलंय.

काहीपण ऐकून घ्यायला हिंदू रस्त्यावर पडलेत का?, फडणवीसांची आक्रमक भूमिका

शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात मोगलाई आली आहे का, हिंदू रस्त्यावर पडलेत का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

राज्याचे गृहमंत्री म्हणतात या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करू. मात्र, शरजील उस्मानीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये तो हिंदू समाजाला स्पष्टपणे सडका म्हटल्याचे ऐकायला मिळते. त्यानंतरही राज्य सरकार ऐकणार नसेल तर भाजप शांत बसणार नाही. आम्ही आंदोलन सुरु करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

‘एल्गार परिषदेला परवानगी दिलीच का?’

एल्गार परिषद ही समाजात तेढ पसरवण्यासाठी आणि आग ओकण्यासाठीच आयोजित केली जाते. याचा अनुभव असूनही सरकारने एल्गार परिषद आयोजित करण्यास परवानगी दिलीच का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही सरकारची मिलीभगत आहे का, अशी शंका उत्पन्न होते. मात्र, सरकारने शरजील उस्मानीविरोधात कारवाई केलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.

(Pune police Should Arrest Sharjeel Usmani mayor Mohol And Jagdish mulik Will Meet Pune Commissioner)

हे ही वाचा :

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.