
Pranjal Khewalkar : पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली होती. सध्ये ते तरुंगात आहेत. या रेव्ह पार्टीत पोलिसांनी गांजासदृश पदार्थ, दारुच्या बॉटल्स जप्त केल्या होत्या. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगानेही उडी घेतली आहे. या प्रकरणाचा महिलांची तस्करी या दृष्टीनेही तपास करावा अशी मागणी महिला आयोगाने पोलिसांकडे केले आहे. असे असतानाच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असं असा खळबळजनक दावा चाकणकर यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे दावे केले आहेत. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर, निखील पोपटाणी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोबे, श्रीपाद मोहन यादव तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला यांना पुण्यात ताब्यात घेण्यात आले होते. पार्टीच्या ठिकाणाहून 41 लाख 35 हजार किमतीचा कोकने, गांजा, दहा मोबाईल, हुक्का पॉट, दारुच्या बॉटल तसेच इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
प्राजंल खेवलकर यांच्या पुण्यातील हडपसर येथील घरातून एक मोबाईल जप्त करण्यात आला होता. या मोबाईलचे सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडीओ तसेच महिलांचे नग्न आणि अर्धनग्न फोटो, अशोभनीय कृत्यांचे व्हिडीओ हाती लागले आहेत, अशी खळबळजनक माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एकूण सात मुली आढळून आल्या. या मुलींची नावे आरूष या नावाने सेव्ह करण्यात आले होते. आरुष नावाची व्यक्ती महिलांची तस्करी करत होती. आरुष याने या मुलींना पार्टीकरिता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचे लक्षात आले. पोलिसांनी छापा टाकला त्याच्या दोन दिवस अगोदर त्याच हॉटेलमध्ये पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती. त्यावेळीही वेगळ्या मुली बोलवण्यात आल्या होत्या, असाही दावा रुपाली चाकणकर यांनी केलाय.
तसेच प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आपत्तीजनक चॅटिंग आढळून आली आहे. या चॅटिंगमध्ये चित्रपटांत शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधण्यात आला आहे. चित्रपटात संधी देतो, असे सांगून त्यांना वापरण्यात आले. तसेच त्यांचे खर्चाचेही पैसे दिले नसल्याचे या चॅटिंगमध्ये दिसून आले, असंही त्यांनी सांगितलं आहे.
खेवलकर यांच्या काही चॅटिंग मिळालेल्या आहेत. या मुलींना सिनेमात काम देतो म्हणून त्यांची फसवणूक करण्यात आली. महिलांचे आक्षपर्ह फोटो व्हिडिओ मिळाले. त्यांच्या मोबाईलमध्ये अत्याचारासारखे व्हिडिओ आहेत. खेवलकरांच्या मोबाईलच्या व्हिडिओ फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले. 1497 फोटोही आहेत. मुलींचे अश्लील, फोटो व्हिडिओ आहेत. 234 फोटो व्हिडिओ अश्लील आहेत. मुलींना नशा देऊन लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ काढलेले आहेत. या व्हिडिओचा वापर मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात आला, असेही गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांनी केले आहेत. एकनाथ खडसे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.