pune RTO : पुणे आरटीओच्या रडार ऑटो रिक्षाचालक, काय आहे नेमके प्रकरण

तीन आसनी मीटर रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षांच्या मीटरमध्ये नवीन भाड्यानूसार बदल केलेले नाहीत. त्यामुळे हे रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा मनमानी पद्धतीने भाडे तक्ता दाखवून सामान्यांना अक्षरश: लुटत आहेत.

pune RTO : पुणे आरटीओच्या रडार ऑटो रिक्षाचालक, काय आहे नेमके प्रकरण
punertoImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 7:18 PM

पुणे : आरटीओने अलिकडेच मीटर रिक्षांना भाडेवाढ लागू केली आहे. परंतू तीन आसनी ऑटो रिक्षाचालकांना ( Auto Rickshaw ) भाडे वाढ लागू झाली असतानाही या रिक्षा चालकांनी नविन भाडे रचनेप्रमाणे या रिक्षांच्या मीटरमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. परंतू अजूनही पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती क्षेत्रातील तीन आसनी मीटर ( METER ) रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षांच्या मीटरमध्ये नवीन भाड्यानूसार बदल केलेले नाहीत. त्यामुळे हे रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा मनमानी पद्धतीने भाडे तक्ता दाखवून सामान्यांना अक्षरश: लुटत आहेत. त्यामुळे ज्या रिक्षा चालकांनी नवीन भाडे रचनेप्रमाणे मीटरमध्ये बदल केलेला नाही. त्यांच्या विरोधात आरटीओने ( RTO )आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑटो रिक्षा चालकांना त्याच्या रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेट करण्यासाठी युनियनच्या मागणीनूसार परवानाधारी रिक्षा चालकांनी गैरसोय टाळण्यासाठी आरटीओने दिलेल्या मुदतीत मीटर मध्ये सुधारणा करण्याची वेळ दिली आहे. रिक्षा आणि काळी पिवळी टॅक्सी चालकांना यापूर्वी १ ते ३० नोव्हेंबर पर्यंत, आणि नंतर १ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मीटर रिकॅलीब्रेशनची मुदत दिली होते.

आरटीओने दिलेली शेवटची संधी ३१ जानेवारीलाच संपल्याने आता आरटीओ दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे. मीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा चालकांवर आता रिक्षांचे लायसन्स निलंबित केले जाणार आहे. तसेच प्रतिदिन ५० रूपये दंड तसेच किमान ५०० ते कमाल २००० रूपयांचा तडजोड शुल्क घेतले जाणार आहे. फुले नगर आणि आळंदी रोड मैदानावर रिक्षांच्या मीटरची तपासणी केली जात आहे.

६० टक्के रिक्षांचे मीटर कॅलीब्रेशन पूर्ण 

६० टक्के रिक्षांचे मीटर कॅलीब्रेशन नवीन भाड्याप्रमाणे बदलले आहे. पुणे शहर आणि चिंचवड सहीत जिल्ह्यात सुमारे १.२० लाखाहून अधिक ऑटो रिक्षा आहेत. आरटीओने दिलेल्या माहितीप्रमाणे साठ टक्के रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे तब्बल पन्नास हजार रिक्षा चालक आता आरटीओच्या रडारवर आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.