पुण्यात 2.6 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारणार; राजाराम पूल ते फन टाइम थिएटरपर्यंतचा मार्ग होणार सुसाट

पुण्यात (Pune) अजून एक उड्डापूल (flyover) उभारण्यात येणार असून, तो सिंहगड (Sinhagad Road) रस्त्यावरील राजारामपूल ते फन टाइम थिएटरपर्यंत  बांधला जाणार आहे.

पुण्यात 2.6 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारणार; राजाराम पूल ते फन टाइम थिएटरपर्यंतचा मार्ग होणार सुसाट
पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली आहे.

पुणेः पुण्यात (Pune) अजून एक उड्डापूल (flyover) उभारण्यात येणार असून, तो सिंहगड (Sinhagad Road) रस्त्यावरील राजारामपूल ते फन टाइम थिएटरपर्यंत  बांधला जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. (A 2.6 km flyover will be constructed in Pune, Citizens will be relieved of traffic congestion on Sinhagad Road)

वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. सिंहगड परिसरातील या कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी शहरात अजून एक उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. मोहोळ म्हणाले की, राजाराम पूल ते फन टाइम थिएटर पर्यंत हा उड्डाणपूल असेल. या उड्डाणपुलाची लांबी 2.6 किलोमीटर राहणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकर यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असून, यावेळी पालकमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

कोंडीचे शहर

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेमधील संशोधकांच्या पथकासह अमेरिकतील तीन विद्यापीठांनी भारतातील 154 शहरामधील वाहतूक कोंडीची पाहणी केली. त्या शहरांमधील वाहतुकीचा वेग मोजला होता. त्यात पुणे हे देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे सातवे शहर असल्याचे समोर आले होते. वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीतही पुण्याने विसावा क्रमांक पटकावला होता.

सिटी बसचा वापर करावा

उड्डाणपूल उभारून वाहतूक कोंडी सुटेलच याची खात्री नाही. कारण घराबाहेर पडताना प्रत्येकजण आपली चारचाकी अथवा दुचाकी घेऊनच पडतो. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त होते. शिवाय प्रदूषणही वाढते. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या दोन्हीवरही मात करायची असेल, तर जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा म्हणजेच सिटी बसचा वापर करावा लागेल. त्यानंतरच हा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा पुणेकरांचे असेल हाल होत राहतील, यात शंका नाही.

दिल्ली, मुंबईसारखी परिस्थिती

पुण्याची परिस्थितीही दिल्ली आणि मुंबईसारखी होत चालली आहे. पुणे अवाढव्य वाढले आहे. येणाऱ्या त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सशक्त राहिली नाही किंवा तिचा वापर नागरिकांनी केला नाही, तर वाहतूक कोंडीचे संकट भयंकर होणार आहे. याचा विचार करता आतापासूनच त्याचेन नियोजन करण्याची गरज आहे. (A 2.6 km flyover will be constructed in Pune, Citizens will be relieved of traffic congestion on Sinhagad Road)

इतर बातम्याः

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! उत्तर पूर्व भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार

वातावरण राष्ट्रवादीमय, ZP, महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, अजित पवारांचे आदेश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI