बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला 16 तासांनी बाहेर काढलं!

पुणे : बोअरवेलमध्ये अडकलेल्या 6 वर्षीय मुलाला 16 तासांनी बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आले आहे. रवी पंडीत हा काल संध्याकाळी खेळता खेळता 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. काल संध्याकाळपासून गावकरी आणि  NDRF चे पथक त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर 16 तासांनी त्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. रवी पंडीत मिल […]

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला 16 तासांनी बाहेर काढलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

पुणे : बोअरवेलमध्ये अडकलेल्या 6 वर्षीय मुलाला 16 तासांनी बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आले आहे. रवी पंडीत हा काल संध्याकाळी खेळता खेळता 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. काल संध्याकाळपासून गावकरी आणि  NDRF चे पथक त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर 16 तासांनी त्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

रवी पंडीत मिल असं या 6 वर्षाच्या मुलाचे नाव आहे. रवी मूळचा शेगाव पाथर्डीचा रहिवाशी असून त्याचे आई-वडील रस्त्यावर दगड फोडण्याचे बिगारी काम करतात.

सहा वर्षीय रवी पंडीत 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची घटना काल पुण्यातील आंबेगावात घडली होती. बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. गेल्या 16 तासापासून रवी मृत्यूशी झुंज देत होता.

ही बोअरवेल 200 फूट खोल असून हा मुलगा 10 ते 15 फूट खोलीवर अडकला होता. रवीचे आई-वडील थोरांदळे जाधववाडी येथे रस्त्याचे काम करत असताना रवी त्या ठिकाणी खेळत होता आणि याच ठिकाणी खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला.

घटनास्थळी एनडीआरएफचे पथक, स्थानिक नागरिक आणि मंचर पोलिसांच्या मदतीने रवीला बाहेर काढण्यासाठी कालपासून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अखेर त्याला बाहेर काढण्यात एनडीआरएफ पथकाला यश आले आहे.

व्हिडीओ : बोअरवेलमध्ये ६ वर्षांचा मुलगा पडला, NDRF चे शर्थीचे प्रयत्न सुरु

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.