Corona Effect : बाहेर कोणाचा हातात हात घेऊ नका, घरात आल्यावर हातात हात घ्या : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा सल्ला दिला, तसंच हातात हात न घेण्याचं आवाहनही केलं Ajit Pawar suggests not to shake hands

Corona Effect : बाहेर कोणाचा हातात हात घेऊ नका, घरात आल्यावर हातात हात घ्या : अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 10, 2020 | 9:55 AM

पुणे : ‘राज्य आणि देशावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने काळजी घ्या. कोणाचा हात हातात घ्यायचा नाही. घरात गेल्यावर हातात हात घ्या. बाहेर कोणाला वाईट वाटलं, तरी चालेल. मात्र कोणाच्या हातात हात देऊ नका’, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. (Ajit Pawar suggests not to shake hands)

आरोग्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पुण्यात मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यामुळे मला काळजी वाटत असून यासंदर्भात आयुक्त, जिल्हाधिकारी यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री असून पुण्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचं रान करीन, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

अजित पवार पुण्यात कोंढवा जलवाहिनी आणि श्री गुरुनानक देवजी उद्यान लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा सल्ला दिला. काही ठिकाणी शाळांना सुट्टी देण्याचंत आली आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.

कोरोनाचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं आढळणाऱ्या दाम्पत्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दोघांनाही विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. हे दाम्पत्य नुकतंच दुबईहून आल्याचीही माहिती आहे.

हेही वाचा : कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार

दरम्यान, अजित पवारांनी भाषणात पुण्याच्या कचऱ्याच्या समस्येवरही भाष्य केलं. तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. प्रदूषण रोखण्यासाठी उद्यान विकसित करण्याची गरज आहे. पुण्यात कचऱ्याची समस्या आहे. त्यामुळे कचरा आपल्या भागात जिरवून विल्हेवाट लावली पाहिजे, आपला कचरा दुसऱ्याकडे टाकल्यावर त्यांना पण प्रदूषणाचा त्रास होतो. येत्या काळात प्रगत तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मी ‘ग्रीन सेस’ लावला असून कचरा व्यवस्थापन प्लांट उभारण्यात येणार आहे. नदी खराब करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नसल्याचं अजित पवारांनी दरडावून सांगितलं. ग्रीन सेस लावला असला तरी मुद्रांक शुल्काचा टॅक्स कमी केल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेचा मेडिकल कॉलेज काढण्याचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यंदा मंदीचे सावट असल्याने अर्थसंकल्प सादर करण्यास अनेक अडचणी होत्या. मात्र सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं सर्वांनी कौतुक केलं. या अर्थसंकल्पात पुण्यातील रिंग रोड, क्रीडा विद्यापीठ, मुलींचे वस्तीगृह, मेट्रो संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी म्हटलं.

पुण्याचे महापौर भाजपचे असून राजकारणात वेगवेगळी विचारधारा आसते. मात्र जनता सर्वस्व असून आम्हाला तो निर्णय स्वीकारावा लागतो. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आहे. मात्र पुण्याच्या विकासासाठी राज्याबरोबरच केंद्राची मदत लागणार आहे. सर्व सोंग आणता येतात मात्र पैशाचं सोंग आणता येत नसल्याचे अजितदादांनी म्हटलं. (Ajit Pawar suggests not to shake hands)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.