…जेव्हा राज्यमंत्र्यांच्या मुलाची गाडी बनते ॲम्बुलन्स

इंदापूर-बारामती मार्गावर वाहनातून जाणाऱ्या अपघातग्रस्तांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज याने मदतीचा हात दिला. Ambulance Becomes The Car Of The Son Of The Minister Of State

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:29 PM, 19 Dec 2020
...जेव्हा राज्यमंत्र्यांच्या मुलाची गाडी बनते ॲम्बुलन्स

पुणेः “खाण तशी माती” या म्हणीची प्रचिती आज इंदापूर तालुकावासीयांना अनुभविता आली. इंदापूर-बारामती मार्गावर वाहनातून जाणाऱ्या अपघातग्रस्तांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज याने मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. (Ambulance Becomes The Car Of The Son Of The Minister Of State)

त्याचं झालं असं की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यातील एका लग्नसमारंभासाठी सोलापूर जिल्ह्यातील माढा या ठिकाणी गेले होते. लग्न सोहळा उरकून इंदापूर तालुक्यात घरी परतत असताना इंदापूर – बारामती मार्गावरती शेळगाव गावाच्या हद्दीत चारचाकी आणि दोन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. या अपघाताजवळ जमलेली गर्दी पाहून श्रीराज भरणे तिथेच थांबले, या विचित्र अपघातात चार जण गंभीर जखमी झाले होते.

श्रीराज भरणे यांना विचित्र अपघातातील गंभीररीत्या जखमी झालेल्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर यांना तातडीने रुग्णालयात पोहोचविणे गरजेचे असल्याचे समजले. ॲम्बुलन्सची वाट न पाहता त्यातील दोन गंभीर जखमींना तात्काळ आपल्या स्वतःच्या आलिशान गाडीतून घेऊन गेले. तर दुसऱ्या दोन जखमींना देखील तेथे उपस्थित असलेल्या मित्रांना विनंती करून त्यांना देखील गाडी उपलब्ध करून दिली.

बारामतीच्या खासगी रुग्णालयात वेळेत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची मदत केली, त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे जसे जनतेच्या अडीअडचणीच्या वेळी तात्काळ उपलब्ध होतात, त्याच पद्धतीने त्यांचे सुपुत्र श्रीराज भरणे हेदेखील आपल्या वडिलांच्याच कार्यपद्धतीचा अवलंब करीत असल्याचे इंदापूरकरांना दिसून आले. अपघातग्रस्तांना मदत करताना भरणे यांचे विश्वासू सहकारी अंबादास लांडगे यांची ही मोलाची मदत झाली.

संबंधित बातम्या

‘ओ काका आमचा एक फोटो काढा की’…म्हणत विनंती, अन् मंत्री झाले फोटोग्राफर

Ambulance Becomes The Car Of The Son Of The Minister Of State