लोहगाव विमानतळावर ‘विंटर शेड्युल’ पासून 30 विमाने नव्याने धावणार; तपासणी पासून प्रवाश्यांची सुटका

सद्यस्थितीला लोहगाव विमानतळावर 60 विमाने दिवसाला ये-जा करतात. दर तासाला एक या प्रमाणे ही वाहतूक सुरु असते. प्रत्येक फेरीत 1500 प्रवासी प्रवास करतात. कोरोना काळात ही संख्या 600 ते 700 होती. मात्र आता यामध्ये वाढ झाली आहे.

लोहगाव विमानतळावर 'विंटर शेड्युल' पासून 30 विमाने नव्याने धावणार; तपासणी पासून प्रवाश्यांची सुटका
Flight

पुणे – येत्या 1 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या ‘विंटर शेड्युलसाठी’ शहरातील लोहगाव विमानतळ प्रशासन सज्ज झाले आहे. डिसेंबरपासून 24 तास विमानाची सेवा सुरु देण्यात येणार आहे. हे शेड्युल सुरु झाल्यानंतर सद्यस्थितीच्या तुलनेत तब्बल 30 विमानांची संख्या वाढवण्यात येणार आहे. नियमितपणे शहराच्या वाहतुकीबरोबरच इतर नवीन शहरांमध्येही वाहतूक केली जाणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

सद्यस्थिती काय आहे?

लोहगाव विमानतळावरून सद्यस्थितीला लोहगाव विमानतळावर 60 विमाने दिवसाला ये-जा करतात. दर तासाला एक या प्रमाणे ही वाहतूक सुरु असते. प्रत्येक फेरीत 1500 प्रवासी प्रवास करतात. कोरोना काळात ही संख्या 600 ते 700 होती. मात्र आता यामध्ये वाढ झाली आहे. शहरात वेगाने विस्तारत असलेले मेट्रोचे जाळे विमानतळाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात हा डीपीआर तयार केले जाणार आहेत.

तपासणी पासून प्रवाश्यांची सुटका

इतर शहरातून पुण्यात दाखल होणाऱ्या प्रवाश्यांना कोरोनाच्या विमातळावरील कोविड तपासणीच्या लाईनमधून सुटका मिळणार आहे. दुसऱ्या शहरातून प्रवास करून आलेला प्रवासी हा प्रवास सुरु करण्यापूर्वीच आपले लसीकरण प्रमाणपत्र , आरटीपीसीआर टेस्ट दाखवूनच प्रवासाला सुरुवात करतो. त्यामुळे पुन्हा पुण्यातील विमातळावर याचा कागदपत्रांच्या तपासणीत प्रवाश्यांचा विनाकारण वेळ वाया जातो. प्रवाश्यांचा वाया जाणार वेळ व होणार मनस्ताप यामुळं विमातळावर पुन्हा होणारी तपासणी बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार गिरीष बापट यांनी दिली आहे.

सीआयएफएसची संख्या वाढवणार कोरोनानंतर विमातळावरील प्रवाश्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या प्रवासी संख्येची तपासणी करण्याचा ताण कर्मचाऱ्यावर येत आहे. त्यामुळे विमातळावर सीआयएफएसची संख्या वाढवण्यात येणार आहे. चालू घडली विमानतळावर 358असलेलया संख्येत वाढ करून 526  इतकी केली जाणार असल्याची माहिती विमानतळ संचालक संतोष डोके यांनी दिली आहे.

हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा करणारे ATS प्रमुख IPS शिवदीप लांडे बिहार केडरमध्ये परतणार, जाणून घ्या नेमकं कारण

Narendra Modi : नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, कोरोना स्थितीसह लसीकरणाचा आढावा घेणार

Video: चिमुरड्याऐवजी कुत्राच म्हणायला लागला ‘आई’, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक

Published On - 9:22 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI