ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा, परवानगीशिवाय थकबाकी वसुली नाही, बाळासाहेब पाटील यांचं स्पष्टीकरण

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय साखर कारखाने उसाच्या बिलातून थकीत वीज बील वसूल करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब पाटील पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा, परवानगीशिवाय थकबाकी वसुली नाही, बाळासाहेब पाटील यांचं स्पष्टीकरण
बाळासाहेब पाटील
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 11:19 AM

पुणे: महावितरणने शेतकऱ्यांकडे असणारी थकबाकी वसुली करण्यासाठी साखर कारखान्यांकडे प्रस्ताव दिला होता. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंदर्भात साखर कारखान्यांसोबत चर्चा करण्यासाठी आदेश जारी केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयाविरोधात संघर्ष करणार असल्याचं म्हटलं होतं. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय साखर कारखाने उसाच्या बिलातून थकीत वीज बील वसूल करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब पाटील पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय वीज वसूल करणार नाही

राज्यात वीजबिल थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात असताना शेतक-यांच्या वीजबिलाच्या थकबाकीसाठी साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून वसुली करण्यासदंर्भात साखर आयुक्तांनी एक आदेश जारी केला होता. साखर कारखान्यांनी देखील महावितरणची वीज बील वसुली करण्यास असमर्थता दर्शवली होती. “शेतक-यांच्या संमतीशिवाय वीज बिलाची थकबाकी साखर कारखाने वसूल करणार नसल्याचे” सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय. बाळासाहेब पाटील खेड तालुक्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनावेळी माध्यमांशी बोलत होते.

थकबाकी वसुलीचा निर्णय जुनाच

महावितरणनं साखर कारखान्यांनी वीज बिल वसुली करण्यासाठी मदत केल्यास त्यांना काही टक्के लाभ देण्यात येईल असा निर्णय यापूर्वीच घेतला होता. यासंदर्भात साखर आयुक्तांनी आढावा बैठक घेण्याचं म्हटलं. शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास अडचणी येतात त्यामुळं वीज बील थकवलं जातं. महावितरण वीज बील वसुलीसाठी अनेक निर्णय राबवते त्यापैकी साखर कारखान्यांची मदत घेण हा एक निर्णय असल्याचं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले होते.

राजू शेट्टींचा वीज बील वसुलीला विरोध

साखर आयुक्तांनी असा आदेश कोणत्या कायद्यानुसार दिला आहे हे स्पष्ट करावं, अशा प्रकारचा कायदा कुठंही नाही. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार शेतकऱ्याच्या बिलातून कसलिही कपात करता येत नाही. शेतकऱ्याच्या ऊस बिलातून पीक कर्जाचे हप्ते वजा होतात. पीक कर्ज काढताना शेतकरी बँकेला हमीपत्र लिहून दिलेलं असतं. त्याशिवाय इतर कोणतीही कपात करता येत नाही, असं राजू शेट्टी म्हणाले होते. साखर कारखान्यांनी उसाच्या बिलातून रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतल्यास सरकार विरोधात संघर्ष करु, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता.

इतर बातम्या:

देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला

Balasaheb Patil said Mahadiscom electricity bill cutting will not done without farmers permission from sugarcane bill payment

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.