Pune station : पुणे रेल्वे स्थानकात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू, प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन केला रिकामा

Pune station : पुणे रेल्वे स्थानकात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू, प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन केला रिकामा
पुणे रेल्वे स्टेशन (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: tv9

पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे. रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला आहे. दरम्यान, बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. 3 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला होता. या फोन कॉलने एकच खळबळ उडवली.

योगेश बोरसे

| Edited By: प्रदीप गरड

May 13, 2022 | 1:49 PM

पुणे : पुणे रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे. रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला आहे. दरम्यान, बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात पोलीस (Police) तसेच बॉम्बशोधक पथक पाहणी करत आहे. 3 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला होता. या फोन कॉलने एकच खळबळ उडवली. घटनेने परिसरात मात्र भीतीचे वातावरण असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्थानकात (Pune railway station) सकाळी साडे दहाच्या सुमारास बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन रिकामा करण्यात आला होता. बॉम्ब शोधक पथकही यावेळी तपासणीसाठी तैनात करण्यात आले होते. तसेच वाहतूकही थांबवण्यात आली होती. रेल्वे पोलीस स्थानकात आढळलेली वस्तू जिलेटिन (Gelatin) नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

परिसरात खळबळ

पुणे पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी करत तातडीने बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. काही दिवसांपासून पुणे पोलीस स्थानक उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत धमकीचा फोन करणाऱ्यांना अटकही केली होती. त्यानंतर आता दहा दिवसांच्या आतच संशयास्पद वस्तू रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

आधी फोन आणि आता संशयास्पद वस्तू!

3 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला होता. या फोन कॉलने एकच खळबळ उडवली. पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी पुणे रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती. इतकेच काय तर बॉम्ब कुठे ठेवला आहे, याची माहिती हवी असेल, तर सात कोटी रुपये द्या, अशी मागणी आरोपींनी पोलिसांकडे केली होती. या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने कारवाईदेखील केली होती. अवघ्या 48 तासांच्या आत पोलिसांनी फोन कॉल करून खळबळ उडवून देणाऱ्या आणि धमकावणाऱ्या दोघांना अटक केली होती. करण भिमाजी काळे आणि सुरत मंगमतराम ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना पुणे रेल्वे पोलिसांनी अखेर वाघोलीतून अटक करण्यात आली.

‘संशयास्पद वस्तू जिलेटिन नाही’

पुणे पोलीस स्थानकात पाहणी केल्याने संशयास्पद वस्तू ही जिलेटिन नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. ते पाहणी करून झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यानंतर पुणे स्थानकातील पोलिसांकडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अधिक माहिती घेतली. या नंतर आता पुणे पोलीस स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

काय म्हणाले अमिताभ गुप्ता?

हे सुद्धा वाचा

संशयास्पद वस्तूबाबत तपास सुरू

रेल्वे स्थानकातली वाहतूक थांबवण्यात आली होती. या संपूर्ण संशयास्पद वस्तूबाबत तपास केला जात आहे. याबाबत अधिक काय खुलासे पुणे पोलीस करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानक ही वस्तू आढळल्यानंतर पिंजून काढले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें