चिंता वाढली! सुसाईड नोट सोडून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर अजूनही बेपत्ता

बेपत्ता होण्याला 29 दिवस उलटून गेल्यावरही पाषाणकर नेमके कुठे आहेत? या प्रश्‍नाचं गूढ अद्याप उलगडलेले नाही. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

चिंता वाढली! सुसाईड नोट सोडून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर अजूनही बेपत्ता
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 7:41 AM

पुणे : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी (Suicide Note) लिहून बेपत्ता झालेल्या उद्योजक गौतम पाषाणकर (Gautam Pashankar ) यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. बेपत्ता होण्याला 29 दिवस उलटून गेल्यावरही पाषाणकर नेमके कुठे आहेत? या प्रश्‍नाचं गूढ अद्याप उलगडलेले नाही. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. 21 ऑक्‍टोबरपासून ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांना शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांचा कुठेच शोध लागत नसल्याचं समोर आलं आहे. (businessman Gautam Pashankar who left a suicide note is still missing after 29 days)

8 नोव्हेंबरला पाषाणकर हे कोल्हापूरमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर सीसीटीव्हीत दिसून आले होते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं एक पथक कोल्हापूरला रवाना झालं. मात्र, पाषाणकर तिथेही कुठेच सापडले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी सहा पथकं तयार केली असून कोकणातही त्यांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन?

पाषाणकर यांचा मुलगा कपिल याने यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. पाषाणकर यांच्या गायब होण्यात राजकीय व्यक्तीचा हात असल्याचाही आरोप यावेळी त्याने केला. त्यामुळे पोलीस त्यादिशेनेही तपास करत असल्याची माहिती आहे. कपिल याने पोलिसांची भेट घेऊन काही राजकीय व्यक्तींचा नावेही सांगितल्याची माहिती आहे.

गौतम पाषाणकर हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठं नाव आहे. गेल्या 29 दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून गौतम पाषाणकर बेपत्ता झाले होते. पोलीस सध्या जागोजागी पाषाणकर यांचा शोध घेत असून त्यांचे नातेवाईक आणि कार चालकाची चौकशी करत आहेत. पाषाणकर कोणालाही दिल्यास त्यांच्या कुटुंबाला 9822474747 या मोबाईल क्रमांकावर किंवा शिवाजीनगर पोलिस ठाण्याला 020-25536263 या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (businessman Gautam Pashankar who left a suicide note is still missing after 29 days)

ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात सुसाईड नोट

गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला होता.

इतर बातम्या – 

Gautam Pashankar | उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ताच, मुलगा कपिल पाषाणकरकडून अपहरणाचा संशय

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन, मुलाकडून धक्कादायक आरोप

(businessman Gautam Pashankar who left a suicide note is still missing after 29 days)

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.