Pune crime : नकली नोटा देऊन आरोपी पसार; पुण्यातल्या व्यावसायिकाची लष्कर पोलिसांत धाव

सादिक मुबारक शेख यांच्याकडे 500च्या नव्या नोटांची सिरीज आहे, अशी माहिती व्यावसायिकास देण्यात आली. 35 लाखांच्या बदल्यात 1 कोटी रुपयांच्या नव्या सिरीजच्या नोटा मिळतील, असे आमिष दाखवले. असीफ खान हे या आमिषाला बळी पडले.

Pune crime : नकली नोटा देऊन आरोपी पसार; पुण्यातल्या व्यावसायिकाची लष्कर पोलिसांत धाव
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jun 30, 2022 | 7:36 PM

पुणे : व्यावसायिकाला एक कोटी रुपयांच्या नोटा देण्याच्या आमिषाने गंडा (Cheating) घालण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 मे 2022 ते 28 जून 2022 या दरम्यान घडला आहे. सादिक मुबारक शेख, जितेंद्र मेहता, जसविंदर सिंग तारासिंग गुणदेव अशी गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी असीफ नसरी खान (वय 52, कमला पॅव्हेलियन फ्लोअर कॅम्प, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असीफ खान हे व्यावसायिक आहेत. पुण्यातील कॅम्प (Pune camp) परिसरात त्यांचे कार्यालय आहे. त्यांची जसविंदर सिंग आणि जितेंद्र मेहता यांच्याशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यांनी खान यांना गुजरात येथे असणाऱ्या सादिक मुबारक शेख यांची माहिती दिली.

35 लाखांच्या बदल्यात 1 कोटींच्या नोटा

सादिक मुबारक शेख यांच्याकडे 500च्या नव्या नोटांची सिरीज आहे, अशी माहिती त्यांना देण्यात आली. 35 लाखांच्या बदल्यात 1 कोटी रुपयांच्या नव्या सिरीजच्या नोटा मिळतील, असे आमिष दाखवले. खान हे या आमिषाला बळी पडले. त्यांनी आरोपींना 35 लाख रुपये दिले. आरोपींनीही त्यांना पैशांची बॅग दिली. दरम्यान, 35 लाखांच्या बदल्यात 1 कोटी रुपये मिळाल्याने खान हे खूश होते. त्यांनी आरोपींवर विश्वास ठेवून हा व्यवहार केला होता. मात्र त्यांच्या पदरी निशारा आणि फसवणूक आली.

हे सुद्धा वाचा

‘भारतीय बच्चो का बँक पाँच सो नंबर’

असीफ खान यांनी घरी आल्यावर पैशांची बॅग पाहिली. त्यात ‘भारतीय बच्चो का बँक पाँच सो नंबर’ असे लिहिलेल्या खोट्या नोटा त्यांनी दिसल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खान यांनी लष्कर पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फरार झाले आहे. लष्कर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींनी याआधी अशाप्रकारचे काही गुन्हे केले आहेत का, याचाही पोलीस शोध घेणार आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें