Pimpri chinchawad crime | लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने करत तरुणांची फसवणूक ; असे फुलले बिंग

भरतीसाठी आल्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्सला या घटनेची कुणकुण लागली. मिलिटरी इंटेलिजन्सने यांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती सांगवी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले.

Pimpri chinchawad crime | लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने करत तरुणांची फसवणूक ; असे फुलले बिंग
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 7:16 PM

 पिंपरी – लष्करात बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (GREF) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांना गंडा घालणाऱ्या तिघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. सतीश कुंडलिक डहाणे (वय 40 रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम, अक्षय देवलाल वानखेडे (रा. अकोला), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अशी करता होते फसवणूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघेही अनेक तरुणांकडून हजारो रुपये घेऊन नोकरी लावतो असे सांगत. याबाबतची तक्रार गजानन पुरुषोत्तम मिसाळ (वय 23 , जि. अमरावती) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अमरावती येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात मोटार मेकॅनिक पदावर अ‍ॅप्रेंटीसशिप करत आहेत. फिर्यादी व त्यांचे मित्र धनंजय वट्टमवार यांना आरोपी अक्षय वानखेडे याने बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) या आर्मीच्या भरतीमध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदासाठी नोकरीस लावतो, असे आमिष दाखवले. हे काम आरोपी सतीश डहाणे याच्या सांगण्यावरून करत असल्याचे अक्षय याने सांगितले. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या मित्राकडून भरतीसाठी 70 हजार रुपये घेतले. तसेच ते हे 4  जानेवारी 2022 रोजी दुपारी तीनच्या सुमारास रक्षक चौक, औंध मिलिटरी कॅम्पच्या समोर भरतीसाठी आले.

मिलिटरी इंटेलिजन्सने फोडले बिंग भरतीसाठी आल्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्सला या घटनेची कुणकुण लागली. मिलिटरी इंटेलिजन्सने यांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती सांगवी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आर्मी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, रोख रककम, कॉम्प्युटर, पेन ड्राइव्ह, दोन दुसऱ्याच्या नावे असलेले रबरी शिक्के, मिलिटरीचे स्वतःचे बनावट ओळखपत्र, वेगवेगळी बनावट एनव्हलप, कमांडट ग्रेफ सेंटर यांचे ॲकनॉलेज कार्ड, बीआरओचे भरतीचे अ‍ॅडव्हटाईज नंबर 2/2021 चे उमेदवारांचे भरलेले फॉर्म, इत्यादी कागदपपत्रे, तसेच उमेदवांराच्या शैक्षणिक पात्रतेची झेरॉक्स प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड व आटीलरी नाशिक रोड कॅम्प यांचे अ‍ॅप्लीकेशन फॉर्म पोलिसां नी जप्त केले आहे.

Thane Corona Update: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, 24 तासांत 1685 नवे रुग्ण

Virar Accident: मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात; अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Delhi Crime: जॅकेट परत केले नाही म्हणून मित्राची हत्या, दिल्लीतील धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.