भवानी पेठेत कोरोनाचा कहर, 500 च्या वर कोरोनाबाधित रुग्ण

पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 3008 वर पोहोचली (Corona Patient increase Pune) आहे.

भवानी पेठेत कोरोनाचा कहर, 500 च्या वर कोरोनाबाधित रुग्ण
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 10:51 AM

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 3008 वर पोहोचली (Corona Patient increase Pune) आहे. पुणे शहरातील भवानी पेठमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. भवानी पेठेत कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या वर गेला आहे. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला (Corona Patient increase Pune) आहे.

पुणे शहरातील भवानी पेठनंतर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ढोले पाटील विभागात 406 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयापैकी फक्त 5 क्षेत्रीय कार्यालय परिसरात 1800 इतके रुग्ण आढळले आहेत. यात भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग वाडा, येरवडा-धानोरी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरातील एकूण 46 प्रभागापैकी 8 प्रभागात 50 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.

पुण्यातील 5 क्षेत्रीय कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने रेड झोन घोषित करण्यात आले आहे. रेड झोन परिसरातील रुग्णसंख्या कमी करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 3008 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 161 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे. गेल्या 12 तासात पुणे जिल्ह्यात 39 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात आणखी रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या : 

भवानी पेठ, ढोले पाटील, शिवाजीनगर परिसराला कोरोनाचा विळखा, पुण्यात कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?

नागपुरातील मोमीनपुरामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट, शहरातील 45 टक्क्यापेक्षा जास्त रुग्णांची नोंद

मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, दिवसेंदिवस रुग्ण वाढतेच

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.