पुण्यात कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा पार, कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Pune Coronavirus | पुणे शहरात आणि शहरालगत असलेल्या तीनही कॅंटोन्मेंट बोर्डाची कोरोनामुक्तीकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. तिन्ही बोर्डात शनिवारी दिवसभरात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या या सर्व बोर्डात मिळून अवघे 26 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

पुण्यात कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा पार, कोरोनामुक्तीकडे वाटचाल
कोरोना लसीकरणही वेगात सुरू आहे.


पुणे: पुणे शहरात कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा पार पडला आहे. यामध्ये 31 लाख 74 हजार 447 जणांचा पहिला डोस तर 18 लाख 45 हजार 631 जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. महापालिकेने लसीकरणासाठी 200 केंद्र उभारली आहेत. तर खासगी रुग्णालयात देखील मोठ्याप्रमाणात लस उपलब्ध आहे. लसीकरणासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत.

पुणे शहरात आणि शहरालगत असलेल्या तीनही कॅंटोन्मेंट बोर्डाची कोरोनामुक्तीकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. तिन्ही बोर्डात शनिवारी दिवसभरात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या या सर्व बोर्डात मिळून अवघे 26 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 16 जणांवर रुग्णांलयात उपचार सुरू तर 10 जण गृहविलगीकरणात आहेत.

पुण्यात दिवाळी पहाट होणार, आठवडी बाजारही भरणार

पुण्यात डॉक्टर्स, दोन्ही महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नानं पुणे लसीकरणात आघाडीवर आहे. राज्याच्या तुलनेत बारा टक्के लसीकरण पुण्यानं केलं. तर देशाच्या तुलनेत दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रानं केलं आहे. राहिलेलं लसीकरण वेगात कसं करता येईल याची चर्चा करण्यात आली आहे. लोक प्रतिनिधींच्या मागणीवरून दिवाळी पहाटला मंजुरी देण्यात आली आहे. मिशन कवच कुंडल या मार्फत लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पुणे शहरात सीरमच्या सहकार्यानं तर ग्रामीण भागातही लसीकरण केलंय जातंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाहीमहापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केलेत. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.

लसीचे दोन्ही डोस घेतलेले असताना कोरोनाची लागण

राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

संबंधित बातम्या:

Covid Updates: भारतात तिसऱ्या लाटेचा धोका टळलाय का?

दिल्लीमध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार अयशस्वी, धोकादायक पातळीपेक्षा नऊ पट जास्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सर्व मेळावे, दौरे तात्पुरते स्थगित! नेमकं कारण काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI