उपमुख्यमंत्री अजितदादा एक निर्णय घेतात व राज्य सरकार वेगळाच निर्णय घेतं; त्यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम – महापौर मुरलीधर मोहळ

पुणे शहराचे पालकांमंत्री या अजित दादा काही तरी बोलतील पण तसे काही झाले नाही. आपल्याला अपेक्षा आहे, उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना 100 टक्के उपस्थितीचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवतील.

उपमुख्यमंत्री अजितदादा एक निर्णय घेतात व राज्य सरकार वेगळाच निर्णय घेतं; त्यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम - महापौर मुरलीधर मोहळ
मुरलीधर मोहोळ (महापौर, पुणे)

पुणे- शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. त्यानुसार पुण्यातील कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणत शहारातील नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेनेसुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. याबाबत उपमुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र त्यानंतर लगेच ओमिक्रॉन विषाणूचा वाढत्या धोका लक्षात घेत राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली. दोन वेगवेगळ्या नियमावली झाल्याने नागरिकांनी नेमके कोणत्या नियमाचे पालन करायचे, असे म्हणत महापौर मुरलीधर मोहळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सत्ताधाऱ्यांमध्येच विसंवाद राज्यात तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यात विसंवाद दिसून येतोय. तसेच शासनातील मंत्र्यांच्या निर्णयाने नागरिकांत संभ्रम निर्माण होतोय” असे ट्विट करत मोहळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले , ‘महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात येत असताना सर्व गोष्टींना सुरु होण्यास परवानगी देण्यात आली. पण नाट्यगृह आणि सिनेमागृह यांचा अजिबात विचार केला जात नव्हता. पण कलाकारांच्या रोजगार या मुद्द्यावरून अखेर राज्य सरकारने 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली. त्या निर्णयाने कलाकारांना फारसा दिलासा मिळाला नाही. हा मुद्दा अजित दादांबरोबर झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अजित दादांनी शहरांतही सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 100 टक्के मान्यता दिली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी सायंकाळी नव्या नियमावलीत नाट्यगृह आणि सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील असे नमूद केले.

पुन्हा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलतील पुणे शहराचे पालकांमंत्री या अजित दादा काही तरी बोलतील पण तसे काही झाले नाही. आपल्याला अपेक्षा आहे, उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना 100 टक्के उपस्थितीचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवतील, असेही ते म्हणाले आहेत.

Video : आमच्या घरातल्या मुलीचं लग्न!, संजय राऊतांसोबत डान्सच्या व्हिडीओवरुन होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

Pune School Reopening : पुण्यात शाळांची घंटा वाजणार का? विद्येच्या माहेरघरात संभ्रमाचं वातावरण

सव्वा वर्षांपूर्वी कोरोनाबळी गेलेल्या दोघांचे मृतदेह शवागारात कुजत, रुग्णालयाने दोन कुटुंबांच्या दुःखावरची खपली काढली

Published On - 3:23 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI