बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानं देश चालतोय, काही संकुचित व्यक्ती खाली खेचण्याचा प्रयत्न करतात : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र शासनाच्या वतीनं इंदू मिलच्या जागेवर ते काम सुरु आहे ते येत्या काळात पूर्ण होईल. चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना त्याचं दर्शन घेता येईल, असं फडणवीस म्हणाले.

बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानं देश चालतोय, काही संकुचित व्यक्ती खाली खेचण्याचा प्रयत्न करतात : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधित केलं. ज्या महामानवाने देशाला संविधान दिल, त्या महामानावाच्या स्मारकासाठी चैत्यभूमीवर एक इंचही जागा मिळू नये हे दुर्दैव आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. रामदास आठवले यांना घेऊन नरेंद्र मोदींना भेटलो. तीन दिवसात 2300 कोटी रुपयांची जागा एकही रुपया न घेता ती जागा महाराष्ट्र शासनाकडं हस्तांतरीत केली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं इंदू मिलच्या जागेवर ते काम सुरु आहे ते येत्या काळात पूर्ण होईल. चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना त्याचं दर्शन घेता येईल, असं फडणवीस म्हणाले. आज देश त्या मार्गानं चाललेला आहे. मात्र, काही व्यक्ती संकुचित त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देश बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरुन चालतोय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीत दिलेलं जे भाषण आहे ते आजही द्यावं अशी आज परिस्थिती आहे. संकुचित वृत्ती सोडून आपण एका मार्गानं चालण्याचा विचार केला तर आपण हा देश महान बनवू शकतो. आज देश त्या मार्गानं चाललेला आहे. मात्र, काही व्यक्ती संकुचित त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून येत्या 10 वर्षात जगातील विकसित देश म्हणून विकसित करु शकतो. देशासमोरील सर्व प्रश्नांचं उत्तर संविधानात आहे. संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामुळं देश एक आहे. संधीची समानता या मुळं कोणी मागं राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल, असं फडणवीस म्हणाले.


लंडनमधील घर महाराष्ट्र सरकारनं घेतलं

मला संधी मिळाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ज्या ठिकाणी राहून शिक्षण घेतलं त्या ठिकाणाचा लिलाव होत होता. त्या लिलावाबाबत सरकारकडून निर्णय होत नव्हता. शेवटच्या काही दिवसात आम्ही नरेंद्र मोदींच्या सहकार्यानं, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मदतीनं ते घर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खरेदी केलं. तिथल्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्र उपलब्ध आहेत. बाबासाहेबांची जर्मन पत्र उपलब्ध आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जपानमधील वाकाहाम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली. चिंचोलीचे वामनराव गोडबोले यांनी काही वस्तू जपून ठेवल्या होत्या. 1999 ला आमदार झालो तेव्हा त्यांची भेट घेतली. तेव्हा एका खोलीत त्या वस्तू होत्या. नंतर त्याच्या विकासासाठी काम केलं. नरेंद्र मोदींच्या सहकार्यानं त्या वस्तू जतन करण्याचा प्रयत्न केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला अभिप्रेत अशा पद्धतीनं काम केलं. महूला आणि अंबळवे स्मारकाच्या कामाला निधी दिला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या:

कधी दहशतवादी समजून गोळ्या घालतात, आमच्या सारख्यांना देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकतात; संजय राऊतांचा मोदी सरकारवर आरोप

Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!

Devendra Fadnavis said Nation stand on the path of Babasaheb Ambedkar thoughts some people trying to mislead nation

Published On - 11:38 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI