डिभे आणि वडज धरण 100 टक्के भरले; मात्र जुन्नर तालुका अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत

कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या धरणामध्ये आजमितिला 21.66 टक्के टिएमसी ( एकूण साठा 72.99 टक्के) पाणीसाठा झाला असल्याची माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधरे विभागाने दिली आहे.

डिभे आणि वडज धरण 100 टक्के भरले; मात्र जुन्नर तालुका अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत
आंबेगावातील डिभे आणि वडज धरण 100 टक्के भरले
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 7:31 PM

जुन्नर/जयवंत शिरतर : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असले असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी आंबेगाव तालुक्यातील डिभे धरण तर जुन्नर तालुक्यातील वडज धरण हे 100 टक्के भरले आहेत. डिभे धरण हे आंबेगाव तालुक्यात येत असून त्याचा पाणीपुरवठा संपूर्ण नगर जिल्ह्यात व आंबेगावमधील शेतीसाठी कालव्यामार्फत होत असतो. कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या धरणामध्ये आजमितिला 21.66 टक्के टिएमसी ( एकूण साठा 72.99 टक्के) पाणीसाठा झाला असल्याची माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधरे विभागाने दिली आहे. (Dibhe Dam in Ambegaon is 100 per cent full; Junnar taluka is still waiting for rains)

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येणारे पाच धरणे आणि त्यामधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.

येडगाव धरण – 58.84 टक्के माणिकडोह धरण – 53.95 टक्के वडज धरण – 100 टक्के पिंपळगाव जोगा – 45 टक्के चिल्हेवाडी धरण – 96.35 टक्के डिभे धरण (आंबेगाव तालुका) – 100 टक्के

जुन्नर तालुक्यात मुळातच पाऊस कमी झाल्याने जुन्नर तालुक्याला शेतीसाठी सातत्याने वरदान ठरणार पिंपळगाव जोगा हे धरण फक्त 45 टक्के इतकेच भरले आहे. मुळातच हे धरण माळशेज घाटमाथ्यावर असल्याने या धरणात येणारा पाणीसाठा हा घाटमाथ्यावर होणाऱ्या पावसावरच अवलंबून आहे. मुळात मुरबाड आणि कल्याण परिसरात होणारा पाऊस आणि माळशेज घाटात होणारा पाऊस यामुळेच या धरणाच्या पाण्यात साठवणूक होत असते. मात्र यावेळेस माळशेज घाटात म्हणावा असा पाऊस न झाल्याने या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नाही.

धरण उशाला अनं कोरड घशाला

याच धरणाच्या पाण्यावर जुन्नर तालुक्यातील शेती तसेच पारनेर तालुक्यातील शेती अवलंबून असते. मात्र यावेळेस धरणातच पाणीसाठा उपलब्ध नसल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याच्या बागायती पिकाचे भवितव्य पावसावर अवलंबून आहे. एवढेच नव्हे तर पारनेर तालुक्यातील शेती व्यवसायाची हिच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यावर दुष्काळाचे सावट हे डोक्यावर आहे. तालुक्यात जरी चार धरणे असली तरी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी “धरण उशाला अनं कोरड घशाला…!” अशी म्हणण्याची वेळ आली आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. (Dibhe Dam in Ambegaon is 100 per cent full; Junnar taluka is still waiting for rains)

इतर बातम्या

नोकरीच्या शोधात त्याच्या जीवनाचा अंत, डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर रक्तबंबाळ अवस्थेत तरुण, उपचारादरम्यान मृत्यू

योजनेत सहभागी व्हा अन् लाखोंची बक्षिसे मिळवा, पशुपालकांसाठी सुवर्ण संधी

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....