नवीन वर्षात लोहगाव विमानतळावरून होणार दुबईसाठी उड्डाण

ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील लोहगाव विमानतळ प्रशासनही सज्ज झाले आहे. कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा लोहगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दुबईसाठी उड्डाण करण्याची तयारी एका विमान कंपनीने दर्शवली आहे. इतर देशातील उड्डाणांसाठीही बोलणी सुरु

नवीन वर्षात लोहगाव विमानतळावरून होणार दुबईसाठी उड्डाण

पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आणि देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेनंतर नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. पुढील महिन्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळाची निवड करण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोना निर्बंधातील शिथिलतेमुळे आंतराष्ट्रीय हवाई वाहतूकही सुरु झाली आहे. ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील लोहगाव विमानतळ प्रशासनही सज्ज झाले आहे. कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा लोहगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दुबईसाठी उड्डाण करण्याची तयारी एका विमान कंपनीने दर्शवली आहे. इतर देशातील उड्डाणांसाठीही बोलणी सुरु असल्याची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली आहे.

लोहगाव विमानतळावरील दुरुस्तीनंतर हवाई वाहतुकीची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विमानतळावर प्रवाश्यांची वाढणारी गर्दी लक्षात घेत टर्मिनल इमारतीतील शासनाची विविध कार्यालये स्थलांतरित करण्यात आली आहेत.  ती जागा प्रवाश्यांना उपलब्ध करून देण्यात आली   आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’चे 326 कर्मचारी तैनात केले असल्याची माहितीही विमानतळ प्रशासनाने दिली आहे. 1  डिसेंबरनंतर दिवस-रात्र उड्डाणे सुरू झाल्यानंतर दिवसाला सरासरी160 उड्डाणे होतील.

हस्तांतर  प्रक्रिया सुरू

लोहगाव विमानतळासमोरील बहुमजली वाहनतळ जानेवारीत कार्यान्वित करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळेल तसेच लष्कराची साडेतेरा एकर जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट

विमानतळ वाहतुकीची सद्यस्थिती
लॉकडाऊनमध्ये टर्मिनल प्रतितास 700-800 प्रवासी ये-जा करत.
सद्यस्थितीला प्रति तास 1500-1800 प्रवासी ये-जा करतात.

Corona Vaccine Fruad | कोरोनावरील लस बनवतो सांगून डॉक्टरची 12 लाखांना फसवणूक, परदेशी नागरिकासह दोघांना अटक

Maharashtra School Reopen: पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Corona Vaccine Fruad | कोरोनावरील लस बनवतो सांगून डॉक्टरची 12 लाखांना फसवणूक, परदेशी नागरिकासह दोघांना अटक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI