राजभवनात मुस्लिमांना नमाजसाठी जागा दिलीत, आता आम्हालाही द्या; हिंदू जनजागृती समितीची मागणी

राजभवनात मुस्लिमांसाठी मशीद वा जागा दिली जात असेल, तर शासन सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळे राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. | hindu janajagruti samiti

राजभवनात मुस्लिमांना नमाजसाठी जागा दिलीत, आता आम्हालाही द्या; हिंदू जनजागृती समितीची मागणी
राजभवन
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 7:30 PM

पुणे: राजभवनात मुस्लिम कर्मचाऱ्यांप्रमाणे हिंदू धर्मीयांनाही पूजापाठासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून (hindu janajagruti samiti ) करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीकडून राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांना पत्र पाठवण्यात आले आहे. नियमानुसार हिंदू कर्मचार्‍यांनाही त्यांच्या संख्येनुसार राजभवनात मंदिरासाठी मोठी जागा देण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. (hindu janajagruti samiti demand to give place to Hindus for Worship in Raj Bhavan)

राजभवनातील (RajBhavan) मुस्लिम कर्मचार्‍यांसाठी नमाज पठणासाठी राजभवनात एक खोली देण्यात आली आहे. तिथे बाहेरील मुस्लिमही नमाज (Muslim Namaz) पठणासाठी येत होते. शुक्रवारी तेथे गर्दी होत होती. कोरोना काळात राज्यशासनाच्या निर्देशानुसार राजभवनातील प्रार्थनास्थळ अन्य प्रार्थनास्थळांप्रमाणे बंद झाले होते. त्यावर ‘रझा अकादमी’ या मुस्लिम संघटनेकडून मुस्लिमांसाठी नमाजसाठी राजभवनातील सदर मशीद खुली करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

राजभवनात मुस्लिमांसाठी मशीद वा जागा दिली जात असेल, तर शासन सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळे राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीने एका पत्राद्वारे राज्यपालांकडे केली.

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रात समितीने म्हटले आहे की, राज्यघटनेप्रमाणे भारतीय शासन आणि प्रशासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) आहे. सर्वधर्मसमभावाचे पालन करणारी आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माला झुकते माप देता येत नाही. राज्यघटनेत न्याय, बंधूता, समता आदी मूलभूत तत्त्वाचे पालन बंधनकारक आहे.

त्यामुळे ज्याप्रमाणे राजभवनात मुस्लिम कर्मचार्‍यांना एका मशीदीसाठी जागा देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर आणि नियमानुसार हिंदू कर्मचार्‍यांनाही त्यांच्या संख्येनुसार राजभवनात मंदिरासाठी मोठी जागा देण्यात यावी. जेणेकरुन राजभवनातील हिंदू कर्मचारी आणि बाहेरील हिंदू महाआरती, पूजा, उपासना, तसेच विविध धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करतील. तसेच त्या जागेत जाऊन त्यांना नित्य उपासना करता येईल, समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

नमाजासाठी राजभवनाची मशीद उघडा; रजा अकादमीची राज्यपालांकडे मागणी

प्रवीण दरेकर राजभवनावर, राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट

(hindu janajagruti samiti demand to give place to Hindus for Worship in Raj Bhavan)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.