Ketaki Chitale : ‘…शिक्षा झालीच पाहिजे!’ केतकी चितळे हीच्या पोस्टवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

Ketaki Chitale : '...शिक्षा झालीच पाहिजे!' केतकी चितळे हीच्या पोस्टवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आक्षेप
केतकी चितळे, अभिनेत्री
Image Credit source: TV9 Marathi

कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासत्मक लिहिणं त्यांच्या मरणाची वाट पाहणे ही विकृतीच आहे, अशीही स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

अश्विनी सातव डोके

| Edited By: सिद्धेश सावंत

May 14, 2022 | 12:15 PM

पुणे : अखिर भारतीय ब्राह्मण महासंघानं अभिनेत्री केतकी चितळे हीच्या (Ketaki Chitale) फेसबुक पोस्टचा निषेध करत तिला सुनावलंय. अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणाचं अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून (Akhil Bhartiya Bhahman Mahasangh) समर्थन करण्यात आलं. राष्ट्रवादी बरोबरच आमचं वैचारिक शत्रूत्व कायम आहे आणि आम्ही भविष्यात सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांची लढत राहू, असं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं म्हटलंय. पण कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासत्मक लिहिणं त्यांच्या मरणाची वाट पाहणे ही विकृतीच आहे, अशीही स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या आजाराला शिक्षा झालीच पाहिजे, असं सांगत आनंद दवेंची केतकी चितळेवर टीका केली आहे. शरद पवारांवर (Facebook post on Sharad Pawar) केलेल्या टीकेवरती ब्राह्मण महासंघाकडूनही केतकी चितळेबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. फेसबुकवर एक वादग्रस्त कविता शेअर करत केतकी चितळेनं खळबळ उडवून दिली होती.केतकीच्या या फेसबुक पोस्टवरुन नवा वाद चर्चेत आलाय.

नेमकं प्रकरण काय आहे?

केतकी चितळे हीनं एक कविता फेसबुकवरुन शेअर केली होती. या कवितेतून शरद पवारांवर वादग्रस्त शब्दांत टीका करण्यात आली होती. केतकी चितळेने फेसबुक पोस्टमध्ये शेअर केलेल्या कवितेवरुन चौफेर टीकाही करण्यात आली होती. यानंतर कळव्यात केतकीविरोधात गुन्हादेखील झाला होता.

केतकी चितळेची फेसबुक पोस्ट

Ketaki Chitale Facebook Post

केतकीची पोस्ट

चर्चांना उधाण

केतकी चितळेनं केलेल्या पोस्टवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्यावर कारवाईची मागणीदेखील केली आहे. कळव्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तिच्यावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

प्रकरण काय?

शरद पवार यांनी साताऱ्यात 9 मे रोजी एक भाषण केलं होतं. एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी एका कवितेचा संदर्भ आपल्या भाषणात दिला होता. या कवितेतून हिंदू देव देवतांबाबत शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यांवरुन वाद सुरु झालेला असतानाच आता केतकी चितळेनं शरद पवारांवर ज्या भाषेत फेसबुक पोस्ट केली आहे, ती अनेकांना खटकली असल्याचं पाहायला मिळतंय.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केतकी चितळेवर प्रश्न विचारत हे नशेबाज लोक आहेत, असं म्हणत केतकी चितळेला फटकारलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें