मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातील अडथळा दूर, आजपासून रेल्वे वाहतूक पुन्हा रुळावर

अखेर तीन दिवसांनी या रेल्वे रुळावर कोसळलेल्या दरडी हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातील अडथळा दूर झाला आहे.

मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातील अडथळा दूर, आजपासून रेल्वे वाहतूक पुन्हा रुळावर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील रेल्वेसेवा ठप्प झाली होती. आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन्सची संख्या वाढवण्यात आली आहे. कोरोनाचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावरही झाला आहे.

पुणे : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी (21 जुलै) रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर तीन दिवसांनी या रेल्वे रुळावर कोसळलेल्या दरडी हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे रुळावर आल्या आहेत. (Maharashtra Rain Ghat Landslide Central Railway Mumbai Pune Express Trains Restoration)

मुंबई-पुण्यातील रेल्वे ट्रॅकवर दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे आजपासून पुणे-मुंबई, पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मुंबई कोल्हापूर एक्सप्रेस, मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. तसेच डेक्कन क्वीन एक्सप्रेस धावणार आहे.

दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सह्याद्रीच्या विविध घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस बरसतो आहे. सध्या सह्याद्रीच्या पट्ट्यात मान्सूनचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई ते पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. घाटात वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यातील काही दरडी या थेट रेल्वेच्या मार्गावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

तीन आठवड्यांपासून दरडी हटवण्याचं काम सुरु 

यानंतर सलग तीन दिवस रेल्वे मार्गावरील दरडी हटवण्याचे काम सुरु होतं. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे दरडी हटवण्याच्या कामात अनेक अडथळे येत होते. घाटाच्या परिसरात सध्या जोरदार वारा पाऊस पाहत आहे. यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना सुरु होत्या. अखेर कालपासून पावसाने विश्रांती घेतल्याने या दरडी हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

(Maharashtra Rain Ghat Landslide Central Railway Mumbai Pune Express Trains Restoration)

संबंधित बातम्या :

Kasara Landslide | कसारा घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे प्रयत्न, पाहा रेल्वेमार्गाचे फोटो

Kasara Landslide | कसारा घाटात दरड कोसळली, कोणकोणत्या ट्रेन्स रद्द? लोकल वाहतुकीवर काय परिणाम?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI