दाढी-कटिंगसाठी दुप्पट दर, महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचा निर्णय

महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात लांबलचक वाढलेली दाढी आणि कटिंग करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

दाढी-कटिंगसाठी दुप्पट दर, महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचा निर्णय
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 4:56 PM

पुणे : लॉकडाऊनदरम्यान संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे (Maharashtra Salon and Parlor Association). त्यातच आता महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात लांबलचक वाढलेली दाढी आणि कटिंग करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दाढी-कटिंगसह इतर सेवांचा दर तब्बल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे (Maharashtra Salon and Parlor Association).

लॉकडाऊन पूर्वी कटिंगचा दर हा 60 ते 80 रुपये होता. मात्र आता नवीन दरानुसार ग्राहकाला 100 ते 120 रुपये द्यावे लागणार आहेत. तर दाढीचा पूर्वीचा दर हा 40 ते 50 रुपये होता मात्र आता ग्राहकांना दाढीसाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायिकांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. पीपीई किटसह इतर साहित्य खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांचा खर्च वाढणार आहे, त्याचबरोबर दुकान भाडं, लाईट बिल आणि घर खर्च संभाळण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेचे राज्यभरात सभासद असून पुण्यात साधारण 15 हजार सलून दुकानदार या संघटनेचे सभासद आहेत.

“लॉकडाऊनदरम्यान सलून व्यवसायिक अस्तित्वाची लढाई लढत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद आहे. सलून व्यवसायिक अधिक अडचणीत आला आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सलून चालू आहेत तर काही भागांमध्ये बंद आहे. ज्या भागांमध्ये सलून बंद आहेत, त्या भागांमध्ये चालू करण्यात यावे, अशी विनंती सरकारला करतो”, असं महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद म्हणाले.

लॉकडाऊनदरम्यान काही भागांमध्ये सलून व्यवसायिक सुरु झाला आहे. मात्र त्या भागांत खर्चदेखील भरपूर आहे. ग्राहकाची आणि स्वत:ची काळजी घेण्यासाठी पीपीई किट घ्यायचं आहे. सॅनिटायजिंगही करायची आहे, याशिवाय विविध प्रकारची काळजीदेखील घ्यायची आहे. त्यामुळे सलून व्यवसायिकांचा खर्च वाढला आहे. या खर्चाला अनुसरुन महाराष्ट्रात सर्व पार्लर असोशिएशन आणि अनेक नाभिक संघटनांनी एकत्र येऊन दाढी-कटींगचे दर दुप्पट ठरवले आहेत. सलून व्यवसायिकाला जनतेनं सहकार्य करावे, अशी मी विनंती करतो, असं महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशन अध्यक्ष सोमनाथ काशिद म्हणाले आहेत.

हेही वाचा :

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग, बीडमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

Unlock 1 | खिडक्या उघडा, तीन फुटांचे अंतर राखून आसन व्यवस्था करा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स

Lockdown 5.0 | शिर्डी रेड झोनमध्ये, साईबाबा मंदिर उघडण्याबाबत अनिश्चितता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.