पुणे जिल्हाधिकारी पदासाठी जोरदार फिल्डिंग, मंत्र्यांकडे लॉबिंग, चार नावं चर्चेत

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पुणे जिल्हाधिकारीपदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी पदासाठी जोरदार फिल्डिंग, मंत्र्यांकडे लॉबिंग, चार नावं चर्चेत
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 3:50 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना कारभार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी पदासाठी मंत्र्यांकडे जोरदार लॉबिंग सुरु असून सध्या चार जणांची नावं चर्चेत आहेत. तर मावळते जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पंतप्रधान कार्यालयातील उपसचिवपदाचा कार्यभार आज (10 ऑगस्ट) स्वीकारला. (Ministers IAS Officers lobbying Fielding for Pune Collector)

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 1 लाख 8 हजार 284 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 469 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत पुण्याचा कारभार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांच्याकडे बारा तास जबाबदारी राहण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे नाव सोमवारी रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र नाव जाहीर होण्यास उशीर झाल्यास कोरोना नियंत्रणावर परिणाम होण्याची भीती आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

उपमुख्यमंत्री अजित पवारच पालकमंत्री असलेल्या या ‘कोरोनाग्रस्त’ जिल्ह्याचा कारभार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने उपाययोजना करण्यासाठी मर्यादा येणार आहेत. पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं महत्वाचं जिल्हा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्ह्यात मर्जीचा अधिकारी नियुक्त करण्यावर भर आहे. आपल्या मर्जीतील जिल्हाधिकाऱ्यांसाठी अनेक लोकप्रतिनिधींची फिल्डींग लावली. त्याचबरोबर अनेक इच्छुक जिल्हाधिकाऱ्यांची नेत्यांकडे लॉबिंग सुरु केलं आहे.

कोणाकोणाची नावे चर्चेत?

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी सध्या राजेश देशमुख सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत. राजेश देशमुख यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारीपदी काम केलं आहे.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, एमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, लातूर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचं नाव चर्चेत आहे. नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचं नाव मागं पडलं आहे.

मावळते जिल्हाधिकारी नवल किशोर राम PMO मध्ये

पुण्याचे मावळते जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमओमध्ये उपसचिवपदी नवल किशोर राम यांची वर्णी लागली आहे. चार वर्षांसाठी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत.

संबंधित बातमी 

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

(Ministers IAS Officers lobbying Fielding for Pune Collector)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.