पुरंदरेंच्या अस्थींचे गडावर विसर्जनाचे वृत्त निराधार मनसेची माहिती; मनसेच्या निर्णयाला राजकीय संघटनांचा विरोध

इतिहास संशोधक ब.मो.पुरंदरे यांच्या अस्थी 11 गडांवर विसर्जित करण्याची भूमिका मनसेने घेतल्याचे समजले. शासनाने या प्रकाराला कायद्याने बंदी घालावी. अन्यथा, महाराष्ट्रात नव्याने सामाजिक वातावरण गढूळ होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

पुरंदरेंच्या अस्थींचे गडावर विसर्जनाचे वृत्त निराधार मनसेची माहिती;  मनसेच्या निर्णयाला राजकीय संघटनांचा विरोध
purandare

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवा निर्माण सेनेनं पुरंदरेंच्या शिवशाही विचार पुढे चालवत त्यांच्या अस्थी शिवनेरी, तोरणा, राजगडसह 11 किल्ल्यांवर विसर्जित करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मनसेच्या या निर्णयाला राज्यातील विविध राजकीय संघटनानी तीव्र विरोध केला आहे.

सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न

इतिहास संशोधक ब.मो.पुरंदरे यांच्या अस्थी 11 गडांवर विसर्जित करण्याची भूमिका मनसेने घेतल्याचे समजले. शासनाने या प्रकाराला कायद्याने बंदी घालावी. अन्यथा, महाराष्ट्रात नव्याने सामाजिक वातावरण गढूळ होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.तरी शासनाने अशा प्रकारच्या कृतीस तात्काळ पायबंद घालावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आणि प्रशांत धुमाळ यांनी केली.

रेशीमबागेत अस्थींचे विसर्जन करा
तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत या भूमिकेला विरोध केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ” खरे तर मेल्यानंतर वैर संपते. ब.मो पुरंदरेंनी छ. शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंची बदनामी केली आहे. ब.मो.पुरंदरेंच्या अस्थी विसर्जन गडकिल्यांवर करण्यापेक्षा रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात करावे. छत्रपतींचे गडकिल्ले आम्हां बहुजनांना प्रेरणा देतात.” असे सांगितले आहे.


याबरोबरच मनसेच्या निर्णयानंतर अनेक शिवप्रेमींनीही संताप व्यक्त केला आहे. गड-किल्ले ही स्मशानभूमी नाही, नवा पायंडा पाडू नये, अशा शब्दात सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मनसेच्या या अनेकांनी निर्णयाला थेट विरोध दर्शवला आहे.

ते वृत्त निराधार
दुसरीकडे विविध संघटनानी घेतलेल्या विरोधी भूमिकेनंतर मनसेने आता सोशल मीडियातील अस्थींचे गडावर विसर्जन करण्याचं वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे. मनसेचे राज्य सचिव आणि प्रवक्ते योगेश खैरे यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, अशा प्रकारे कुठल्याही किल्ल्यावर अस्थीचे विसर्जन करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबधित बातम्या:

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अण्णा हजारेंचं पाठबळ, मुख्यमंत्र्यांशी करणार पत्रव्यवहार

Waqf Board land scam case: पुण्याचे उपजिल्हाधिकारी अजय पवार ED समोर हजर

पुणे म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करताय? वाचा मुख्य शहरातून म्हाडाचे प्रकल्प किती अंतरावर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI