Pune crime : लाचखोर तलाठी जाळ्यात! चार हजार रुपये घेताना पुण्याच्या टोकावडेतल्या तलाठ्याला ‘लाचलुचपत’नं रंगेहात पकडलं

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शासकीय कार्यालयात लालेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार लाच देण्यास तयार नव्हते मात्र तलाठ्याने पाच हजारांची मागणी केली होती.

Pune crime : लाचखोर तलाठी जाळ्यात! चार हजार रुपये घेताना पुण्याच्या टोकावडेतल्या तलाठ्याला 'लाचलुचपत'नं रंगेहात पकडलं
तलाठी कार्यालय, राजगुरूनगरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 7:09 PM

खेड, पुणे : खेड (Khed Pune) तालुक्यातील वाळद येथील जमिनीच्या सातबारावर नोंद घालण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत पोलिसांनी (Anti-Corruption Bureau) रंगेहात पकडून अटक केली आहे. खेड तालुक्यातील टोकावडे सजाचे सुजित सुधाकर अमोलिक असे कारवाई केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणात खेड तालुक्यातील वाळद येथील तक्रारदार यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लोकसेवक तलाठी अमोलिक यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोड करत चार हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, लाचेची (Bribe case in pune) मागणी केल्याची तक्रार पुणे लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली होती. त्यानुसार कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या तलाठ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पाच अधिकारी कार्यरत

तक्रारीनुसार तालुक्याच्या ठिकाणी राजगुरूनगर येथे असलेल्या कार्यालयात ही लाच स्वीकारण्यात येणार होती. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. यामध्ये पाच अधिकारी कार्यरत होते. त्यानंतर लोकसेवक तलाठी अमोलिक यांना चार हजार रुपये लाच स्वीकारल्यावर लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी राजगुरूनगर येथील तलाठी कार्यालयात अटक केली.

कलम सातअन्वये गुन्हा

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शासकीय कार्यालयात लालेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार लाच देण्यास तयार नव्हते मात्र तलाठ्याने पाच हजारांची मागणी केली होती. शेवटी चार हजार देण्याचे ठरले. त्यातही पाच अधिकारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

एकाला अटक

खेडमधीलच आणखी एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे वृत्त आहे. खेड तालुक्यातील मोई येथे मॉर्निग वॉकला गेलेल्या तानाबाई येळवंडे या वृद्ध महिलेचा चोरीच्या उद्देशाने डोक्यात रॉड मारून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिन्याची चोरी केली होती. यात या महिलेचा मृत्यू झाला होता. महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत महाळुंगे पोलिसांनी या खूनप्रकरणी एकाला अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.