पिंपरी चिंचवडमधील खेळांडूसाठी खूशखबर, जलतरण तलाव खुले होणार; पालिकेकडून आदेश जारी, नेमक्या अटी काय?

पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुले होणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील जलतरण खुले करण्याच्या निर्णयामुळं शहरातील खेळाडूंना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवडमधील खेळांडूसाठी खूशखबर, जलतरण तलाव खुले होणार; पालिकेकडून आदेश जारी, नेमक्या अटी काय?
PCMC swimming pool
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 8:02 PM

पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुले होणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील जलतरण खुले करण्याच्या निर्णयामुळं शहरातील खेळाडूंना दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसाठी जलतरण तलाव खुले होणार नाहीत. जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील सविस्तर अटी आदेशात देण्यात आल्या आहेत.

फक्त खेळांडूंना परवानगी

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाच मुभा देण्यात आली आहे. जलतरण प्रशिक्षकांचे लसीचे दोन्ही डोस असणं बंधनकारक करण्यात आले आहेत. सर्व उपाययोजना नुसार हे आदेश उद्यापासून लागू होणार आहेत. तसं परिपत्रक पालिका आयुक्त यांनी काढलं आहे.

आदेशात काय म्हटलंय?

राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड- 19 या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम 2020 अंमलात आलेला आहे. महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कोविड 19 च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केलेले आहे. साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोविड 19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केला आहे.

1) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जलतरण तलाव जलतरण स्पर्धेची तयारी करणा-या खेळाडूंच्या सरावासाठी सुरु राहतील.

2) सदर ठिकाणी कार्यरत असणारे जलतरण प्रशिक्षक यांनी कोचिङ प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा (डोस) पूर्ण झालेले असणे अनिवार्य राहील.

3) या आदेशातील नमूद बाबी व्यतिरिक्त इतर बाबीसाठी 14 ऑगस्ट रोजी निर्गमित आदेश लागू राहतील.

संदर्भाय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे अधन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील. पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात हा निर्णय लागू राहील.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 26 हजार 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 252 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 26 हजार 115 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 252 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 469 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

इतर बातम्या:

Corona Cases In India | देशात सक्रिय कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घसरण, कोरोनाबळींच्या संख्येतही घट

मुख्यमंत्री बनण्यासाठी हत्तीची सवारी, ते टॉस उडवून शिक्षकांची निवड, कोण आहेत पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी?

Pimpari Chinchwad Municipal Corporation Commissioner Rajesh Patil issue orders to allow swimming pool who participate in competition

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.