पूर्वनियोजित कार्यक्रम बदलायचा की नाही हे राज्यपालांनी ठरवावं : अजित पवार

तर पोलिसांना नाईलास्तव गुन्हे दाखल करावे लागतात, असं अजित पवार म्हणालेत,

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 11:09 AM, 26 Jan 2021
पूर्वनियोजित कार्यक्रम बदलायचा की नाही हे राज्यपालांनी ठरवावं : अजित पवार
ajit pawar

पुणेः विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढल्यामुळे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिलीय. सांगली आणि कोल्हापूरमध्ये रॅली काढणारे सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे लोकं असोत, मात्र आंदोलन करताना नियमांचे पालन केले नसेल, तर पोलिसांना नाईलास्तव गुन्हे दाखल करावे लागतात, असं अजित पवार म्हणालेत, ते पुण्यात बोलत होते. (Police Have To File Charges; Ajit Pawar Criticize On Raju Shetty)

यावेळी प्रजासत्ताक दिन ‌साधेपणाने साजरा करावा लागतोय. काही नवीन वाहनं पुणे पोलिसांसाठी आलेली आहेत, कालच अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत, ‌आपल्या मेट्रोचं कामाला गती देण्याचा ठरवलेला आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.

पूर्वनियोजित कार्यक्रम बदलायचा की नाही हे राज्यपालांनी ठरवावं: अजित पवार

राज्यपालांना बऱ्याच दिवसांपूर्वी शेतकरी नेत्यांना भेटायचं असल्याचा निरोप देण्यात आला होता, पण ज्यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न असतो त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रम बदलू शकतो हे त्यांनी ठरवायचं असतं, मात्र राज्यपालांबद्दल मी काही बोलणं योग्य वाटत नाही, असंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.

जेव्हा कुणाची घरवापसी होणार तेव्हा मी जाहीर करेन: अजित पवार

घरवापसीबद्दल नवाब मालिकांना विचारा, मात्र जेव्हा कुणाची घरवापसी होणार तेव्हा मी जाहीर करेन, शिळ्या कडीला उत आणण्याचं काम करणार नसल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय. जयंत पाटील पक्षबांधणीसाठी फिरतायत, सर्वच राजकीय पक्ष आपला पक्ष वाढवण्याचं काम करतायत, असंही अजित पवारांनी सांगितलं.

राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावाः अजित पवार

आमचा अधिकार जो असतो त्यानुसार कॅबिनेट रितसर ठराव करून ठराव पाठवलाय, राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यायला पाहिजे, त्यामुळे काही लोक वंचित राहत आहेत, असंही अजित पवार म्हणालेत.

शेतकऱ्यांना कार्पोरेटच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न 

दरम्यान, राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना जाहीर विरोध या आधी अनेकवेळा नोंदवेलला आहे. ‘कित्येक दशकांपासून हमीभावाला कायद्याचं स्वरूप द्या अशी मागणी करत आहे. पण, मोदी सरकार काळे कायदे आणून शेतकऱ्यांना कॉर्पोरेट हाऊसेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतंय,’ असा आरोप राजू शेट्टींनी 16 जानेवारी रोजी केला होता. तसेच मागील कित्येक दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. तापमान दीड डीग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. 55 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी केंद्र सरकारला दया आली नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी केली होती.

संबंधित बातम्या

रॅलीदरम्यान कोरोना नियम न पाळल्याचा ठपका, राजू शेट्टींवर गुन्हा दाखल

Police Have To File Charges; Ajit Pawar Criticize On Raju Shetty