पुण्यात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाची शक्यता? पोलीस आयुक्तांच्या पत्राने खळबळ

पुणे हे मुंबई नंतर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे शहर आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात लोकं कामासाठी येतात. मुंबईपेक्षा सुरक्षित असलेल्या पुण्यात मात्र बॉम्ब स्फोटाची शक्यता वर्तवल्याने पुणेकरांच्या भूवया उंचावल्या आहेत. पुणेकरांसाठी ही खबरदारीचा उपाय म्हणून सावध राहण्याची गरज आहे. काय म्हटलंय पोलीस आयुक्तांनी जाणून घ्या.

पुण्यात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाची शक्यता? पोलीस आयुक्तांच्या पत्राने खळबळ
पुण्यात बॉम्ब स्फोटाची शक्यता
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 2:50 PM

PUNE : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या एका पत्राने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात दहशतवाद्याकडून बॉम्ब स्फोटाची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की,”एखादी अतिरेक संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून पुणे शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला धोक्याचा इशारा दिला आहे.

नामांकित हॉटेलला नोटीस

कल्याणी नगर परिसरात असलेल्या या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या हॉटेल व्यवस्थापनाकडून अनेकदा डिस्कोथेक परवान्यातील अटी शर्तीचा भंग करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या असूनही संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून याकडे हेतू पुरस्कर कानाडळा केला जात असल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस पत्रातून करण्यात आला आहे.

दुर्घटना घडण्याची शक्यता

दरम्यान या हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने आग, चेंगराचेंगरी, गॅस गळती, अफवा यासारखी घटना घडून जीवितहानी होऊ शकते. तसेच सध्या अतिरेकी कारवायाबाबत अलर्ट आहे. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या हॉटेलचा डिस्कोथेक परवाना रद्द का करण्यात येऊ नये असे या नोटीसीद्वारे विचारले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने ही कारणे दाखवा नोटीस असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे पोलीस अलर्ट

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच ही शक्यता व्यक्त केल्याने पुणे पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. या हॉटेलमध्ये मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या बाबतीत मात्र तितकी गंभीरता दिसत नाही. त्यामुळे जर एखादी मोठी घटना घडली तर त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.