पुण्यात दगडाने ठेचून गुंडाची हत्या, तर पोलीस आयुक्तालयाजवळही गोळीबाराचा थरार

पुण्याच्या खराडी भागात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. मोकळ्या मैदानात दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आलंय. शैलेश घाडगे असं हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचं नाव आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:35 PM, 5 Oct 2020
पुण्यात दगडाने ठेचून गुंडाची हत्या, तर पोलीस आयुक्तालयाजवळही गोळीबाराचा थरार

पुणे : पुण्याच्या खराडी भागात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. मोकळ्या मैदानात दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आलंय. शैलेश घाडगे असं हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचं नाव आहे. (Pune Crime- Merder Of Goon Shailesh Ghadge Crushing Him With Stone)

आज पहाटेच्या सुमारस खराडी परिसरात ही घटना घडलीये. मारेकऱ्यांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केलीये. अनेक गुन्ह्यांमध्ये शैलेश आरोपी होता. शैलेशच्या नावावर अनेक गुन्हे नोंद आहेत.

पुणे आयुक्तालयाजवळ गोळीबाराचा थरार

दरम्यान, एकीकडे गुंडाच्या हत्येने थरकाप उडाला असताना, तिकडे पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ दिवसाढवळ्या गोळीबार पाहायला मिळाला. पोलीस पोलीस आयुक्तालयाजवळ गोळीबार झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. एसबीआय ट्रेझरी कार्यालयासमोर हा फायरिंगचा प्रकार घडला. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(Pune Crime- Merder Of Goon Shailesh Ghadge Crushing Him With Stone)

संबंधित बातम्या

पुणे : गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरण : दोषींना फाशी नव्हे तर जन्मठेप

पुणे : झोपेतच चिमुरडीचं अपहरण, हत्या करुन नराधमांनी मृतदेह नाल्यात फेकला

पुणे : 10 दिवसांत 11 हत्या, पुणे गुन्हेगारीच्या रस्त्यावर