महिलांना अश्लील मेसेज, पुण्यात 84 वर्षांच्या पुजाऱ्याला अटक

महिलांना अश्लील मेसेज, पुण्यात 84 वर्षांच्या पुजाऱ्याला अटक

बाबा हरिदास महाराज उर्फ शरद बाळकृष्ण पत्की असं 84 वर्षीय आरोपी पुजाऱ्याचं नाव आहे.

अनिश बेंद्रे

|

Dec 19, 2019 | 3:00 PM

पुणे : पुण्यात महिलांना अश्लील मेसेज करणाऱ्या 84 वर्षांच्या पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या स्वारगेट पोलिसांनी पुजाऱ्याला (Pune Pujari Vulgar Messges) साताऱ्यातून बेड्या ठोकल्या आहेत.

बाबा हरिदास महाराज उर्फ शरद बाळकृष्ण पत्की असं आरोपी पुजाऱ्याचं नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराज महिलांना अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता, अशा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी कारवाई करत साताऱ्यातून त्याच्या मुसक्या आवळल्या.

लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघा तरुणांना बेड्या

आरोपी पुजारी शरद पत्की हा उच्चशिक्षित असून इलेट्रिक इंजिनिअर आहे. मात्र तो वारंवार अश्लील मेसेज करत असल्याचा आरोप काही महिलांनी केला होता.

महिलांच्या तक्रारीनंतर स्वारगेट पोलिसांनी साताऱ्यात माण तालुक्यातील शेणवाडी गावातील एका मंदिरातून त्याला अटक केली. आरोपी पुजाऱ्याला शिवाजीनगर कोर्टात (Pune Pujari Vulgar Messges) हजर केलं जाणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें