Pune Rajesh Tope : कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तरी लक्षणं सौम्य; गंभीर स्थिती नसल्याची राजेश टोपे यांची पुण्यात माहिती

Pune Rajesh Tope : कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तरी लक्षणं सौम्य; गंभीर स्थिती नसल्याची राजेश टोपे यांची पुण्यात माहिती
कोरोना परिस्थितीविषयी माहिती देताना राजेश टोपे
Image Credit source: tv9

वाढत्या कोरोना रुग्णांबाबत तसेच एकूणच कोविडची राज्यातील परिस्थिती याबाबत त्यांनी पुण्यात माहिती दिली. सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. आपल्या राज्याने यापेक्षा मोठी रुग्णसंख्या पाहिल्याचे ते यावेळी म्हणाले.

प्रदीप गरड

|

May 13, 2022 | 1:41 PM

पुणे : कुठेही कोरोनाची चौथी लाट (Corona) असल्याचे माझे सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे ,ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत (Health ministers) बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाहीत, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील, असा अनुमान काढता आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. वाढत्या कोरोना रुग्णांबाबत तसेच एकूणच कोविडची राज्यातील परिस्थिती याबाबत त्यांनी माहिती दिली. सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. आपल्या राज्याने यापेक्षा मोठी रुग्णसंख्या पाहिल्याचे ते यावेळी म्हणाले.

‘ड वर्गाची परीक्षा घेणार’

आरोग्य भरती संदर्भात लवकर परीक्षा घेतली जाईल. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. पोलिसांचा सविस्तर अंतिम अहवाल अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले.

ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचेही मत लक्षात घेतले आहे.

दोन्हीही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ. हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचादेखील निर्णय झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

काय म्हणाले राजेश टोपे?

हे सुद्धा वाचा

‘किडनी रॅकेट संदर्भात योग्य ती कारवाई होणार’

पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भातील प्रकरणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निलंबनाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. सुनावणी सुरू आहे. आणखी आठ दिवस लागतील. सगळ्या बाजूची माहिती घेऊन योग्य तो निकाल दिला जाईल, गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कारवाई होईल, असे राजेश टोपे म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें