Pune Shivajirao Adhalrao : उद्धव ठाकरेंना हिंदूजननायक म्हटलं तर कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण? शिवाजीराव आढळरावांचा मनसेला टोला

Pune Shivajirao Adhalrao : उद्धव ठाकरेंना हिंदूजननायक म्हटलं तर कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण? शिवाजीराव आढळरावांचा मनसेला टोला
मनसेवर टीका करताना शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील
Image Credit source: tv9

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठी वातावरणनिर्मिती मनसेकडून सुरू आहे. त्यातच शिवाजीराव आढळराव यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा केला आहे. त्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्याला आढळराव यांनी प्रत्त्युत्तर दिले.

सुनिल थिगळे, प्रतिनिधी

| Edited By: प्रदीप गरड

May 13, 2022 | 3:21 PM

आंबेगाव, पुणे : शिवसेनेचा जन्मच हिंदुत्व ((Hindutva) जागृत करणे आणि हिंदुत्व पेटवणे यामध्ये गेला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची पाठराखण करणारा पक्ष हा शिवसेना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हिंदूजननायक म्हटले तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण नाही, असा टोला शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी मनसेला लगावला आहे. ते आंबेगावात बोलत होते. सध्या राज ठाकरे यांनी हिंदुजननायक म्हटले जात आहे. तसेच हिंदुत्वाची भूमिका स्वीकारून आता त्यांनी राजकारण सुरू केले आहे. अयोध्या दौराही ते करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांना हिंदुजननायक पदवी कोणी दिली, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच ती पदवी काय कॉपीराइट नाही. त्याच्यावर कोणाची मोनोपोलो नाही, असा घणाघात शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे.

ट्विट करत उद्धव ठाकरेंना दिली पदवी

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेतर्फे उद्या म्हणजेच 14 मेला सभा होणार आहे. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) ही जाहीर सभा आयोजित केली आहे. मागील काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-मनसे आणि भाजपा यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू आहे.

हिंदुजननायक असा उल्लेख

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठी वातावरणनिर्मिती मनसेकडून सुरू आहे. त्यातच शिवाजीराव आढळराव यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा केला आहे. त्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्याला आढळराव यांनी प्रत्त्युत्तर दिले.

हे सुद्धा वाचा

‘धमक्यांना भीक घालत नाही’

शिवसेनेचे सर्व नेते आणि शिवसैनिक हे हिंदुत्वाला मानणारे आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मूळ विचार कदीच सोडलेला नाही. कोणाच्या धमक्यांना किती महत्त्व द्यायचे, याला मी मानत नाही. उद्धव ठाकरे तीन वेळा अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाचा हुंकार त्यांच्यात आहे. त्यामुळे कोणी आम्हाला धमक्या देऊ नये, असे आढळवार म्हणाले आहेत. हिंदुजननायक पदवी ढापली तर याद राखा, असा दम मनसे नेते योगेश खैरे यांनी शिवसेनेला दिला होता, त्याचा आढळराव यांनी समाचार घेतला आहे. ही पदवी म्हणजे काय कोणाची मोनोपोली नाही, कोणाचा कॉपीराइट नाही, असे ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें