मिरजेत अनोखा विवाह सोहळा संपन्न, बेघर निवारा केंद्रातील कार्तिकीचं सत्यशोधक पद्धतीनं लग्न

मिरजेत अनोखा विवाह सोहळा संपन्न, बेघर निवारा केंद्रातील कार्तिकीचं सत्यशोधक पद्धतीनं लग्न
मिरजमध्ये कार्तिकी आणि अजय यांचा सत्यशोधक विवाह पार पडला.

सांगलीतील बेघर निवारा केंद्रामधील कार्तिकी आणि अजयचा डवके याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पडला. Sangli Satyashodhak Marriage Story

Yuvraj Jadhav

|

Dec 25, 2020 | 7:13 PM

सांगली: जिल्ह्यातील मिरज येथे अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. बेघर निवारा केंद्रामधील कार्तिकी आणि अजयचा डवके यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पडला. पंढरपूर येथे एका निर्जनस्थळी आठ महिन्यांची असताना मृत आई सोबत कार्तिकी महिन्यात कार्तिकी सापडली होती. आई मृत झाल्याचे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. या बालिकेस ताब्यात घेऊन तिला शिशूगृह येथे ठेवले होते. रेणुका शिशूगृह, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान आणि सांगलीतील बेघर महिला निवारा केंद्र असा प्रवास असणारी कार्तिकी आज विवाह बंधनात अडकली. (Sangli Satyashodhak Marriage Story of Kartiki and Ajay Davake)

आगळा वेगळा सत्यशोधक विवाह

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे कार्तिकी आणि अजयचा विवाहसोहळा सत्यशोधक पद्धतीनं पार पडला आहे. बुलढाणा येथील स्व. वसंतराव हरिभाऊ डक्के यांचा मुलगा अजय याचा विवाह शाहीन शेख यांची मानसकन्या कार्तिकी हिच्याशी झाला. मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने हा विवाह लावण्यात आला. या विवाहात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले गेले. लग्नाच्या ठिकाणी समाज सुधारकांचे फोटो, सामाजिक संदेश देणार फलक लावले होते. अक्षदा म्हणून तांदूळ नवरा नवरीवर टाकलं जात, मात्र या विवाहात तांदूळ टाकले गेले नाही. त्याऐवजी पुष्पवृष्टी करण्यात आली.

अजय डवके यानं लग्नाला उपस्थित राहणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. पुढील काळात सर्वांनी सत्यशोधक पद्धतीनं लग्न करावं असं आवाहन अजयनं केलं आहे. कार्तिकी हिने स्मृती पाटील, विनोद परमशेट्टी, सुरेखा शेख यांचे आभार मानले आहेत. कुटुंब म्हणजे काय असंत हे सुरेखा शेख यांच्याकडे आल्यावर समजले. आई-वडिलांप्रमाणे त्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्यामुळं आत्मविश्वास निर्माण झाल्याचं कार्तिकी हिनं सांगितलं.(Sangli Satyashodhak Marriage Story of Kartiki and Ajay Davake)

कार्तिकीचा पंढरपूर ते मिरज प्रवास

पंढरपूर येथे एका निर्जनस्थळी आठ महिन्यांची असताना मृत आईच्या सोबत कार्तिकी महिन्यात कार्तिकी सापडली ती सापडली होती. आई मृत झाल्याचे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. या बालिकेस ताब्यात घेऊन तिला रेणुका शिशूगृह मध्ये ठेवले. यानंतर तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. परंतु नातेवाईक आढळून आले नाहीत. पेपरला ही फोटोसह बातमी दिली होती. नंतर रेणुका शिशू गृह मध्ये कार्तिकीला दाखल करण्यात आले.

वासुदेव बाबाजी नवरंगे या संस्थेत ट्रान्सफर केले तिथे थोडे दिवसानंतर तीन वर्षाची होईपर्यंत इथे राहिली. तीन वर्षाचे असताना तिला भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मध्ये दाखल केले. तिथे कार्तिकी 18 व्या वर्षांपर्यंत राहिली नंतर ती संस्थेतून बाहेर पडली. स्वतःच्या जबाबदारीवर राहण्याचा प्रयत्न कार्तिकीनं केला, परंतु कोणी नातेवाईक ना घर, ना दार, इकडे तिकडे काही ओळखीच्या लोकांच्या कडे राहत होती. आईचा पत्ता, ना बापाचा पत्ता, जिथे आधार मिळेल तिथे ती राहत होती. या नंतर सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई माहिमकर यांनी तिला आपल्या जिजाऊ महिला आधार केंद्राकडे घेऊन तिला आधार दिला. कार्तिकी त्यानंतर ती आस्था बेघर महिला निवारा केंद्रांमध्ये दाखल झाली. बेघर महिला निवारा केंद्र सुरू सुरू झाल्यानंतर ती तिथेच राहायला लागली व केअर टेकर चे काम करत होती. गेली दीड वर्षे आपल्या आस्था बेघर महिला निवारा केंद्रांमध्ये राहात होती.

अजय डवके हा नवरा मुलगा नवी मुंबई येथे केअर टेकरचे काम करत आहे. त्याला आई आणि एक बहिण आहे. वडील लहानपणी वारले आहेत. त्याचं 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. आयुष्यातील आतापर्यंतच्या खडतर प्रवासानंतर ती 25 डिसेंबर रोजी कार्तिकी ही अजय बरोबर विवाह बंधनात अडकली. तिचे कन्यादान महापालिका उपायुक्त स्मृती पाटील व डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी केलं.

कार्तिकी महिन्यात सापडल्यानं कार्तिकी नाव

कार्तिक महिन्यात पंढरपूरमध्ये आठ महिन्याची असताना सापडल्यानं तिचं नाव कार्तिकी ठेवल्याचं सुरेखा कांबळे शेख यांनी सांगितलं. कार्तिकी आणि अजय डवके यांचा सत्यशोधक विवाह समाजाला प्रेरणा देऊन जाईल, असं न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी संघटना, मिरजचे अध्यक्ष विनोद परमशेट्टी यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

काश्मिरची कली साताऱ्याच्या पाटलांची सून, माप ओलांडताना खास उखाणा

तर सातारची सून झालेल्या काश्मीरच्या कन्येचा प्रॉपर्टीवरचा हक्क अबाधित राहणार?

(Sangli Satyashodhak Marriage Story of Kartiki and Ajay Davake)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें