राजकीय आणि विद्वान मंडळी शिवाजी महाराजांच्या विचारांचा फक्त उपयोग करतात, असं का म्हणाले नाना पाटेकर

सध्याच्या वातावरणात ज्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे ते चुकीचे आहे.शहरातून, गावातून ज्यावेळी शिवाजी महाराजांचे पुतळे उभा केले जातात त्यानंतरच आपली खरी जबाबदारी वाढते.

राजकीय आणि विद्वान मंडळी शिवाजी महाराजांच्या विचारांचा फक्त उपयोग करतात, असं का म्हणाले नाना पाटेकर
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 8:17 PM

पुणेः सध्याच्या वातावरणात ज्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे ते चुकीचे आहे. शहरातून, गावातून ज्यावेळी शिवाजी महाराजांचे पुतळे उभा केले जातात त्यानंतरच आपली खरी जबाबदारी वाढते असे मत अभिनेते (Actor) नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी पुण्यात व्यक्त केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या राजकारणावर बोलत असताना त्यांनी चित्रपटगृहांना लावलेल्या निर्बंधावरही त्यांनी मत व्यक्त करुन कोरोनाचे (Corona) निर्बंध लावायला सरकारला आनंद होतोय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण तापले आहे. अमरावतीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण तापले असतानाच अभिनेते नाना पाटेकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी बोलताना सांगितले की, महाराजांचे फक्त पुतळे उभा करुन चालणार नाही तर त्यासाठी त्यांची शिकवण आत्मसात करायला हवी. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांनी सर्वधर्म समभाव ही भावना ठेऊन त्यांनी रयतेचे राज्य अस्तित्वात आणले. बारापगडी जातीच्या लोकांना एकत्र करुन त्यांनी गुण्यागोविंदानं राहायला शिकवले तिच शिवाजी महाराजांची शिकवण अंमलात आणली तर समजातील सर्व प्रश्न सुटतील अशी भावना त्यांनी पुण्यात व्यक्त केली.

निर्बंध लावायला सरकारला आनंद होतोय का?

तसेच यावेळी कोरोनाबाबत बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचे निर्बंध लावायला सरकारला आनंद होतोय का, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने चालू करणे गरजेची आहेत. सध्या सर्व क्षेत्रातील माणसांची अवस्था बिकट आहे त्यामुळे कोरोनाचे निर्बंध हळूहळू कमी करणे गरजेचे आहेत असे मत व्यक्त केले.

विचारांचा जागर प्रत्येकाने करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो किंवी त्यांच्या विचारांचा जागर प्रत्येकाने घातला पाहिजे मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा उपयोग काही राजकीय आणि विद्वान मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी करतात त्याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये असे सांगत त्यांनी सरकारकडे कोरोनाचे निर्बंध उठवण्याची मागणी केली.

वैयक्तिक टीका करणं मी टाळतो

नाम फाउंडेशन स्थापन केल्यावर त्यामार्फत खूप काम झालं आहे, आणि त्याल सगळ्यांची मदत झाली आहे म्हणून कुणावरही वैयक्तिक टिका करणे टाळतो. तसेच मला याचं वाईट की आपण ही दैवतं वाटून घेतली आहेत. बाबासाहेब आंबेडकर माझे आहेत, महाराज माझे आहेत, आणि टिळकही माझे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.माणूस म्हणून एकमेकांना ओळखायला लागु तेव्हा या स्मारकाचे महत्व समजेल असे सांगत या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद नकोत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Dattatreya bharne | ‘दादा’ हा ‘दादाच आहे, दादाच्या नादी लागल्यावर काही होऊ शकत’.. का म्हणाले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असे?

Pune | पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये हिजाब घालून एकवटल्या शेकडो मुस्लिम तरुणी ; ‘या’ गोष्टीची केली मागणी

Pimpri Chinchwad Municipal Corporation| पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर पाहा काय आहेत तरतूदी , विशेष उपक्रम एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.