Pune ST : ST महामंडळ डिझेल टंचाईच्या संकटात, भोर आगारात डिझेलअभावी अनेक बस जाग्यावरचं उभ्या

परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही दिवसात याचा गंभीर परिणाम एसटी बसच्या दैनंदिन वाहतुकीवर (Traffic Impact) होणारं असल्याची माहिती काही खात्रीलायक सूत्रांनी दिलीय.

Pune ST : ST महामंडळ डिझेल टंचाईच्या संकटात, भोर आगारात डिझेलअभावी अनेक बस जाग्यावरचं उभ्या
भोर आगारात डिझेलअभावी अनेक बस जाग्यावरचं उभ्या
विनय जगताप

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 05, 2022 | 10:37 PM

पुणे : कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर,आता एसटी महामंडळ डिझेल टंचाईच्या संकटात सापडलंय. पुण्यातील भोर आगारात (Bhor Agar) डिझेलअभावी अनेक बस उभ्या ठेवाव्या लागतायंत. तर भोर बस्थानकातून निघणाऱ्या अनेक बस फेऱ्या, डिझेलअभावी (Diesel Shortage) रद्द कराव्या लागतायत. यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना आणि शाळकरी मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. तासंतास उभ राहूनही बस मिळतं नसल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय. पुणे जिल्ह्यातल्या बहुतेक आगारांची हीच परिस्थिती आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही दिवसात याचा गंभीर परिणाम एसटी बसच्या दैनंदिन वाहतुकीवर (Traffic Impact) होणारं असल्याची माहिती काही खात्रीलायक सूत्रांनी दिलीय.

खासगी पंपांचं बिल थकलं

कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता एसटी महामंडळ डिझेल टंचाईच्या संकटात सापडलंय. शाळकरी मुलांना याचा फटका बसतोय तासंतास उभ राहूनही बस मिळतं नसल्यानं प्रवासी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. एसटी महामंडळाला मिळणार डिझेल हे लिटर मागे 13- 14 रुपयांनी महाग मिळतं असल्यानं, गेल्या 5-6 महिन्यांपासून एसटी बसमध्ये खाजगी पंपावर डिझेल टाकले जातं होते. मात्र खाजगी पंपचालकांचे लाखो रुपयांचे बिल थकल्यानं, त्यांनीही एसटी बसला दिला जाणारा डिझेल पुरवठा बंद केलाय. त्यामुळं बसमध्ये डिझेल भरायचं कुठं हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलाय.

एका बसमधील डिझेल दुसऱ्या बसमध्ये

सध्या ज्या बस भोर -पुणे मार्गावर धावतायत, त्या बसमध्ये पुण्यातल्या पंपावर डिझेल फुल भरून ते भोर आगारात आल्यावर त्यातील डिझेल इतर बसमध्ये भरून आगारातील बस चालविल्या जातायत. बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आगारातील कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागतं आहे. पुणे जिल्ह्यातल्या बहुतेक आगारांची हीच परिस्थिती आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही दिवसात याचा गंभीर परिणाम एसटी बसच्या दैनंदिन वाहतुकीवर होणारं असल्याची माहिती काही खात्रीलायक सूत्रांनी दिलीय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें