‘लिव्ह इन’ पार्टनरचं लग्न ठरल्याने तरुणीची आत्महत्या

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने लग्ना करण्यास नकार दिल्याने, निराश झालेल्या 23 वर्षीय तरुणीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गेल्या तीन वर्षांपासून आयटीतील तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. तरुणाचे नुकतेच लग्न ठरले […]

'लिव्ह इन' पार्टनरचं लग्न ठरल्याने तरुणीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने लग्ना करण्यास नकार दिल्याने, निराश झालेल्या 23 वर्षीय तरुणीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गेल्या तीन वर्षांपासून आयटीतील तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. तरुणाचे नुकतेच लग्न ठरले असल्याने तरुणी निराश झाली होती. ‘माझ्याशी लग्न कर’ अस वारंवार सांगूनही तरुणाकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याच कारणातून तिने हे टोकाचं पाऊल उचललं.

धक्कादायक म्हणजे, ज्या तरुणासोबत मुलगी राहायची, त्याच्याच घरच्या टेरेसवर जाऊन तिने उडी मारली. त्यानंतर तिला  उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी सांगवी परिसरातच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने चाकू हल्ला करत, त्याच्याच मैत्रिणीला तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर स्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणातील दोघांवरही उपचार सुरु आहेत आणि आता काही दिवसांच्या अवधीने ही दुसरी घटना समोर आल्याने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....