Trupti Desai on Ketaki Chitale : केतकी चितळे विरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून संस्कारहीन असल्याचं दाखवू नका: तृप्ती देसाई

Trupti Desai on Ketaki Chitale : केतकी चितळे विरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून संस्कारहीन असल्याचं दाखवू नका: तृप्ती देसाई
केतकी चितळे विरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून संस्कारहीन असल्याचं दाखवू नका: तृप्ती देसाई
Image Credit source: tv9 marathi

Trupti Desai on Ketaki Chitale : आपल्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलेल्या "पवार" या शब्दाने ते नक्की शरद पवारांविषयीच लिहिले आहे का?

योगेश बोरसे

| Edited By: भीमराव गवळी

May 14, 2022 | 6:38 PM

पुणे: अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात फेसबुकवरून अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना आणि मनसेनेही टीका केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. एवढेच नव्हे तर ठाणे आणि पुण्यात केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यातही घेतलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तर केतकीला चोप देण्याचीही भाषा केली आहे. मात्र, भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केतकीच्या पोस्टवर वेगळेच प्रश्न उपस्थित केले आहेत. तृप्तीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही. केवळ पवार असा उल्लेख आल्याने त्यांच्यावर आरोप करता येत नसल्याचं सांगतानाच केतकीविरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपण संस्कारहीन असल्याचं दाखवू नका, असा टोलाही देसाई यांनी ट्रोलरला लगावला आहे.

आपल्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलेल्या “पवार” या शब्दाने ते नक्की शरद पवारांविषयीच लिहिले आहे का? कारण व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिलेले दिसत नाही. पवार साहेबांविषयी असे त्यांनी जाणूनबुजून लिहिले असेल तर चुकीचेच आहे. पण केतकी चितळेने जी पोस्ट केली आहे, ती चुकीची वाटणाऱ्यांनी त्यांच्यावर कायदेशीर तक्रारी कराव्यात. तिच्याविषयी चुकीचे शब्द वापरून किंवा तिच्याविरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपल्याला संस्कार नाहीत हे दाखवू नये, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

सर्व पोलीस ठाण्यात तक्रार देणार

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे विरोधात नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ नेरुळ पोलिस स्थानकात दाखल झाले. या शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन दिलं आहे. तसेच नवी मुंबईतील सर्व पोलीस स्थानकात आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देऊ, असं असं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी स्पष्ट केलं.

साताऱ्यात तक्रार दाखल

सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केतकी विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शरद पवार यांच्या बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिलांनी ही तक्रार दिली आहे. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांनी केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

हे सुद्धा वाचा

गोरेगाव पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल

केतकी चितळे आणि निखिल भामरे विरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153, 500, 501, 506(2), 505, 504, 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अॅड. निलेश भोसले यांनी ही तक्रार दिली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें